शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मर्दानी खेळाचे प्रशिक्षक सुरज ढोली यांचे हृदयविकाराने निधन, कोल्हापूरकरांमध्ये हळहळ 

By संदीप आडनाईक | Updated: January 13, 2023 16:05 IST

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवपूर्वकालीन युद्धकलेची परंपरा जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या तसेच मर्दानी खेळांचा विकास करण्यासाठी झटणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या ...

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवपूर्वकालीन युद्धकलेची परंपरा जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या तसेच मर्दानी खेळांचा विकास करण्यासाठी झटणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सुरज विनायक ढोली (वय ४१) यांचे गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे ऐन तारुण्यात अचानक काळाच्या पडद्याआड गेलेला हरहुन्नरी आणि मर्दानी खेळातील रांगडा गडी हरपला. ढोली यांच्या अचानक निधनाने कोल्हापूरकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, पुतण्या, चुलते आणि मोठा मित्रपरिवार आहे.संभाजीनगरचे रहिवासी असलेले सुरज हे मर्दानी खेळासाठी ओळखले जातात. याशिवाय ते कला, रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंग, माउंटेनिअरिंग, पाेहणे, फुटबॉल, जुन्या शस्त्रांचा आणि नाण्यांचा संग्रह, धनुर्विद्या, तलवारबाजी, रायफल शूटिंग, बुद्धिबळ आणि व्हॉलीबॉल खेळात तरबेज होते. त्यांनी कर्नाटक, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गुजरात, जम्मू आणि दिल्लीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. सूरत ते राजगड पायी प्रवास केला होता.मालिका, सिनेमासाठी कामएंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, शाब्बास इंडिया मालिकेतील ते विजेते आहेत. कॅनडातील आंतरराष्ट्रीय युद्धकला महोत्सवात २१ देशांमध्ये कोल्हापूरच्या शंभूराजे मंचचे सूरज यांनी नेतृत्व केले. मराठीशिवाय बंगाली, मल्याळम, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ रिॲलिटी शोमध्येही त्यांनी भाग घेतला होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHeart Attackहृदयविकाराचा झटका