शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एकीकरण’मधील फुटीमुळे मराठी उमेदवारांतच लढती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:55 IST

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील मराठी माणसांचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, खानापूर या चार मतदारसंघांत एकीचा घोळ कायम आहे. त्यामुळे येथे मराठी विरुद्ध मराठी लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये पडलेल्या ...

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील मराठी माणसांचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, खानापूर या चार मतदारसंघांत एकीचा घोळ कायम आहे. त्यामुळे येथे मराठी विरुद्ध मराठी लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे सीमाभागात मराठी विरुद्ध मराठी असे वातावरण तयार झाले आहे. मराठीवर हक्क सांगणाऱ्या चार मतदारसंघांतील या फुटीचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होणार आहे. समितीने सर्वानुमते प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देणे गरजेचे होते, पण मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती असा घोळ झाल्याने तसेच सर्वत्र एकाधिकारशाही झाल्याने उमेदवारांची संख्या कमी करता आलेली नाही. शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी की किरण ठाकूर हा जुना वाद आहे. दीपक दळवी अध्यक्ष असलेल्या मध्यवर्तीस आपण मानत नाही. पहिल्यांदा मध्यवर्ती बरखास्त करून घटक समित्यांना अधिकार द्या ही मागणी किरण ठाकूर यांनी लावून धरली आहे.बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये आमदार संभाजी पाटील यांनी डरकाळी फोडली असल्याने राष्ट्रीय पक्ष हादरले आहेत. ही जमेची बाजू असली तरी ठाकूर गटाने तेथे बाळासाहेब काकतकर यांना रिंगणात उतरवले आहे.‘बेळगाव दक्षिण’मध्ये मध्यवर्तीच्या प्रकाश मरगाळे यांची उमेदवारी निश्चित केली असताना ठाकूर गटाने किरण सायनाक यांना पुढे केले आहे. ‘बेळगाव ग्रामीण’मध्ये मध्यवर्तीचे मनोहर किणेकर विरुद्ध ठाकूर गटाचे चारजण रिंगणात आहेत.म. ए. समितीच्या दोन्ही गटांत एकी व्हावी यासाठी युवक कार्यकर्त्यांची संघटना व कै. सुरेश हुंदरे स्मृती मंचच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. एकीसाठी महाराष्ट्रातून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली जातआहे.समिती विरुद्ध समितीतील संभाव्य लढतीबेळगाव दक्षिण- किरण सायनाक विरुद्ध प्रकाश मरगाळेबेळगाव उत्तर- संभाजी पाटील विरुद्ध बाळासाहेब काकतकरबेळगाव ग्रामीण- मनोहर किणेकर विरुद्ध मोहन बेळगुंदकरखानापूर - अरविंद पाटील विरुद्ध विलास बेळगावकर