शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा

By admin | Updated: September 6, 2015 23:36 IST

हरी नरके : रंगराव मांडरे यांचा द्वितीय स्मृतिदिन; मराठी 'संस्कृत'ची मावशी

कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. जगातील विद्वानांनी मराठीचे महत्त्व मान्य केले असून केंद्र सरकारनेही त्याला मान्यता दिली आहे. मराठी ही ‘संस्कृत’ची मावशी आणि ‘पाली’ची सख्खी बहीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी शुक्रवारी केले. राजेंद्रनगर येथील क्रांतिज्योती महात्मा फुले हायस्कूलतर्फे रंगराव मांडरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते. अभिजात मराठी हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी मधुकर शिर्के होते. प्रा. नरके म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृतमधून निर्माण झाली आहे, हा गैरसमज आहे. संस्कृत भाषेपूर्वी भारतात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर झाल्याचे संशोधनात आढळले आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारला तब्बल सहाशे पुरावे दिले आहेत. केंद्र सरकारनेही याला मान्यता दिली आहे. तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम व उडिया भाषांना अभिजात भाषांच्या पंक्तीत मराठी जाणार आहे. मायमराठी ही जगातील एक समृद्ध परंपरा असलेली भाषा आहे. जगातील २० हजार भाषांत मराठी ही २० व्या क्रमांकाची भाषा आहे. इंग्रजीनंतर जगातील सर्वाधिक शब्दकोश मराठी भाषेतच आहेत. या भाषेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हे मराठी भाषेचेच आहेत; पण मराठीला आपणच कमी लेखत असल्यामुळे तिची हानी झाली आहे, अशी खंतही प्रा. नरके यांनी व्यक्त केली. प्रा. नरके म्हणाले, जीवनातील सर्व अंगे मराठीतून मांडली आहेत. ही भाषाच आपले ओळखपत्र आहे. या भाषेतच संत तुकारामांनी अभंग लिहिले. या अभंगांची मोहिनी जागतिक स्तरावरील लेखकांनाही आहे; पण आपण तुकाराम वाचत नाही. यावेळी अनुराधा मांडरे, बाबासाहेब वडगांवकर, राहुल मांडरे, वसंत कांबळे-लिंगनूरकर, दया मांडरे, आदी उपस्थित होते. मनीषा सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष भोसले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) अभिजात म्हणजे उच्चकुलिनांची भाषा नव्हे अभिजात म्हटले की ती उच्चकुलीन लोकांची भाषा, असा गैरसमज वर्षानुवर्षे आहे. काहींनी त्याची मांडणीही अशीच केली होती; पण अभिजात म्हणजे दर्जेदार, श्रेष्ठ; मग ते सर्वसामान्य व्यक्तीने का लिहिलेले असो, असे मतही प्रा. हरी नरके यांनी मांडले.