शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठा समाजाची शनिवारी गोलमेज परिषद शासनाच्या धोरणाविरोधात चर्चा : ३० संघटनांचे प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:14 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांत मराठा समाजासाठी दिशाभूल करणारे अध्यादेश काढून समाजाचा विश्वासघात केला आहे. या शासनाच्या फसव्या धोरणाविरोधात दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. ७) ऐतिहासिक गोलमेज परिषद आयोजित केली आहे. येथील रेसिडेन्सी क्लबवर दुपारी दोन वाजता ही परिषद होत असून, यामध्ये महाराष्टÑातील ३० संघटनांचे प्रतिनिधी, सर्व दैनिकांचे संपादक, ...

ठळक मुद्दे तज्ज्ञांतून विचारमंथन

कोल्हापूर : राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांत मराठा समाजासाठी दिशाभूल करणारे अध्यादेश काढून समाजाचा विश्वासघात केला आहे. या शासनाच्या फसव्या धोरणाविरोधात दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. ७) ऐतिहासिक गोलमेज परिषद आयोजित केली आहे. येथील रेसिडेन्सी क्लबवर दुपारी दोन वाजता ही परिषद होत असून, यामध्ये महाराष्टÑातील ३० संघटनांचे प्रतिनिधी, सर्व दैनिकांचे संपादक, इतिहासतज्ज्ञ, शैैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी बुधवारी दिली. मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षण मिळावे म्हणून २५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मोर्चे काढले तरीही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे; म्हणून सरकारने ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात, त्या सवलती मराठा समाजाला मिळाव्यात म्हणून काही योजना आखल्या आहेत; पण त्या दिशाभूल करणाऱ्या असून त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला आहे. यासाठी अनेक संघटनांनी एकत्र येऊन कोल्हापुरात शनिवारी गोलमेज परिषदेचे आयोजन केले. परिषदेनंतर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली.यावेळी मराठा विद्यार्थी सेनेचे प्रा. मधुकर पाटील, छावा मराठा संघटनेचे राजू सावंत, राजमाता जिजाऊ ब्रिगेडचे चंद्रकांत पाटील, मराठा समाज संघटनेचे बाळ घाटगे, बाबा महाडिक, संतोष कांदेकर, बाजीराव किल्लेदार, लता जगताप, विद्या पोवार, श्रीकांत भोसले, सुनीता पाटील, सुवर्णा मिठारी, रोहित मोरबाळे, आदी उपस्थित होते.शासनाच्या पुढील निर्णयावर परिषदेत होणार विचारमंथनमराठा समाजाच्या मुलां-मुलींना शिक्षणामध्ये शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत ५० टक्के फी भरण्याचे आश्वासन दिले, ते आम्हाला मान्य नाही.मराठा समाजातील युवकांना उद्योग उभारणीसाठी ‘(कै.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत कर्जे देऊन व्याजमाफीची केलेली योजना फसवी आहे.डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता सुरू करण्यासाठी योजना प्रस्तावित केली असून, यामध्ये विद्यार्थ्यांना वर्षाला १० हजार रुपये शहरातील आणि वर्षाला आठ हजार रुपये ग्रामीणसाठी देणार म्हणजे ही योजना मराठा समाजाची दिशाभूल करणारी आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ‘शाहू महाराज शिक्षण शुल्क’ ही योजना मराठा समाजाच्या कोणत्याही मुलां-मुलींच्या फायद्याची नाही. उच्च तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षणासाठी शासन ५० टक्के फी भरणार असले तरी त्यासाठी जाचक अटी आहेत.जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच्या तक्रारीबाबत व जात प्रमाणपत्र सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे.आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी १०० टक्के फी भरून घेण्याबाबत योजनेमध्ये सूचना केली आहे, ती चुकीची आहे.छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित केलेली अट शिथिल करण्याबाबत घेतलेला निर्णय मराठा समाजासाठी लाभदायक नाही.