शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाने सांगलीत गर्दीचा उच्चांक

By admin | Updated: September 28, 2016 00:45 IST

वाहनांचीही गर्दी : चार तास शहरातील सर्वच रस्ते बंद; दिग्गज नेत्यांच्या सभांचेही विक्रम पडले मागे

सांगली : जवाहरलाल नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या लाखो जणांच्या उपस्थितीत झालेल्या विराट सभा अनुभवलेल्या सांगलीत मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाने मात्र नवा विक्रम केला. सकाळी सातपासून ते मोर्चा संपल्यानंतर सुमारे तीन ते चार तास शहरात येणारे सर्वच रस्ते जवळपास ठप्प झाले होते. त्यामुळे हा मोर्चा तसा अभूतपूर्व झाला. संयोजकांनी पंधरा लाखांहून अधिक गर्दी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी मात्र सायंकाळपर्यंत गर्दीचा कोणताही अंदाज व्यक्त केला नव्हता. जवाहरलाल नेहरू यांची सांगलीत १९६२ मध्ये झालेली सभा विक्रमी ठरली होती. विलिंग्डनचे मैदान त्यावेळी प्रचंड गर्दीने फुलून गेले होते. कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यांबरोबरच कर्नाटकातूनही लोक सांगलीत आले होते. ही गर्दी जवळपास पावणेदोन ते दोन लाखाच्या आसपास असावी, असा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. तसेच मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभा, सांगलीत इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्याही गर्दीच्या सभा यापूर्वी झाल्या. मात्र या सभा, कार्यक्रमांना झालेल्या गर्दीचा आकडा दोन लाखाच्या पुढे गेला नव्हता, पण मराठा मोर्चाने सांगलीच्या गर्दीच्या इतिहासात नवा विक्रम केला. इस्लामपूर रस्त्याने येणाऱ्यांना टोल नाक्याजवळच वाहने थांबवून चालत सांगलीत यावे लागले. मिरजेकडून येणारी बरीच वाहने मिरजेतच अडकून पडली. कोल्हापूर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना शास्त्री चौकापर्यंतही येता आले नाही. त्यांना पार्किंगसाठी शंभरफुटी रस्त्याचा आधार घ्यावा लागला. विट्याकडून येणाऱ्यांना माधवनगरमध्येच वाहने थांबवावी लागली. मराठा समाजबांधवांना चार ते पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली. दुपारी एक वाजता मोर्चा संपला, मात्र वाहने रस्त्याला लागण्यासाठी चार वाजले.(प्रतिनिधी)मी गेल्या ५५ वर्षांतील सांगलीतील जवळपास सर्वच गर्दीच्या सभा पहिल्या आहेत. माझ्या मते १९६२ ला नेहरूंच्या सभेला व वसंतदादा पाटील यांच्या अंत्ययात्रेवेळी झालेली गर्दी मोठी होती. त्यानंतरचा आजचा मोर्चा त्याच्या चौपटीहून अधिक होता. याचा अंदाज व्यक्त करणे अवघड आहे.- बिराज साळुंखे, कामगार नेते, सांगली.