शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांतून भगवे जथ्थे दसरा चौकात मराठा आरक्षण आंदोलन : दलित समाजाचाही पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:43 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, मंगळवारीही ग्रामीण भागातून दुचाकी रॅलीचे अनेक ‘भगवे जथ्थे’ दसरा चौकातील आंदोलनात येऊन सामील झाले.

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, मंगळवारीही ग्रामीण भागातून दुचाकी रॅलीचे अनेक ‘भगवे जथ्थे’ दसरा चौकातील आंदोलनात येऊन सामील झाले. दरम्यान, आंदोलनात फूट पाडण्याच्या उद्देशाने संयोजकांना आलेल्या धमक्यांवर काही नेत्यांनी आपल्या भाषणांतून आगपाखड केली. मराठा समाज हा धमक्यांना कधीही घाबरत नाही. धमक्या द्याल तर शोधून घरात घुसून मारू, असाही इशारा देण्यात आला. दरम्यान, सकाळी उत्तरेश्वर पेठ आणि संयुक्त पंचगंगा तालीम मंडळाच्या वतीने गंगावेश चौकात मानवी साखळी करून आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला.सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंगळवारीही अनेक गावांतून दुचाकी रॅली काढून कोल्हापुरातील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी लोकांनी सहभाग नोंदविला. भगवे झेंडे फडकावत, सळसळत्या रक्ताने ‘जय भवानी - जय शिवाजी’चे नारे देत युवक मोठ्या उत्साहाने आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत होते. मंगळवारीही सुमारे १५ हून अधिक गावांनी तसेच विविध संस्थांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.ठिय्या आंदोलनस्थळी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, उर्वरित महाराष्टÑ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, विश्वासराव देशमुख, मुरगूडचे उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, गणी आजरेकर, शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, वसंतराव मुळीक, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, दगडू कांबळे, फत्तेसिंह सावंत यांच्यासह आदींनी भेट देऊन मराठा आरक्षणाला (पान ३ वर)धमक्या आणि उत्सुकतासकल मराठा ठोक मोर्चाचे संयोजक सचिन तोडकर आणि दिलीप देसाई यांनी आपल्या भाषणातून, आपल्याला इचलकरंजी, हातकणंगले या भागांतून सोमवारी (दि. ३०) सायंकाळपासून फोनवर धमक्या येत असल्याचे सांगितले. या धमक्यांद्वारे एकसंध मराठा मोर्चात फूट पाडण्याचा काहींचा डाव असल्याची जाणीव अनेकांनी भाषणात बोलून दाखविली; पण मराठा समाज अशा भ्याड धमक्यांपुढे वाकणारा, घाबरणारा नसून धमक्या द्याल तर घरात घुसून मारू, असा इशारा यावेळी अनेकांनी दिला. या धमक्यांबाबत पोलीस खात्याकडे आपण रीतसर तक्रार केल्याचेही देसाई यांनी यावेळी भाषणातून सांगितले.दलित समाजही खांद्याला खांदा लावूनमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आंबेडकरवादी समाज, पक्ष, संघटना जनआंदोलन यांनी या दलित समाजाने पाठिंबा दर्शविला. यावेळी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,’ अशा घोषणा देत ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आले. यामध्ये प्रा. शहाजी कांबळे, प्रा. विश्वासराव देशमुख, उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, बाळासाहेब भोसले, सखाराम कामत, नंदकुमार गोंधळी, भाऊसाहेब काळे, रमेश पाचगावकर, सोमनाथ घोडेराव, अब्बास शेख, बाजीराव गायकवाड, प्रकाश अंगरखे, जयसिंग जाधव, पांडुरंग कांबळे, बाजीराव कांबळे आदींचा समावेश होता.मराठा आरक्षणासाठी मंगळवारी कोल्हापुरातील मराठा क्रांती संघटनेच्यावतीने श्री अंबाबाईला साकडे घालण्यात आले. गोेंधळी आणि मागे हातात भगवे झेंडे घेतलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘आरक्षण आमच्या हक्काचं,’ असं म्हणत शिवाजी पेठेपासून महाद्वारापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा