शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

राजकीय क्षेत्रात मराठा नेते जास्त असूनही तोटा

By admin | Updated: October 10, 2016 00:54 IST

समाजाला कर्तव्याची जाण : अ‍ॅड. विवेक घाटगे

कोल्हापूर : १८२७ सालापासून विस्कळीत झालेला मराठा १९० वर्षांनी एकत्र येऊ लागला आहे. मराठा समाज हक्कांसाठी लढताना कर्तव्याची जाण ठेवणारा आहे. राजकीय क्षेत्रात मराठा नेते बहुसंख्येने असल्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झाला. मराठा समाजाकडे कुटुंबप्रमुखासारखे पाहिले जाऊ लागले. पर्यायाने समाजावरील जबाबदारी वाढली. तुमचे नुकसान झाले तरी चालेल; पण इतर कोणावर अन्याय होऊ देऊ नका, या परंपरागत शिकवणीमुळे मराठा समाजाचे नेतेदेखील आरक्षण व सवलती इतर समाजास देण्यास पुढाकार घेऊ लागले. इतर जातींना दिलेल्या आरक्षणाबाबत हरकत नाही; पण ज्या सवलती दिल्या, त्या ‘सवलती’ म्हणून न मानता त्यांचा अर्थ ‘हक्क’ असा घेऊन त्यांचा गैरवापर सुरू झाला. त्यामधून स्वप्रगतीशिवाय बाकी जबाबदाऱ्या दुर्लक्षित होऊ लागल्याचे मत जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ते म्हणाले, १९५० मध्ये राज्यघटनेने जातीच्या कारणावरून आरक्षणाची सुरुवात केली, ती आजअखेर सुरू राहिली. आरक्षणामुळे पात्रता असूनही नाकारले गेल्याची भावना हळूहळू पसरू झाली. सर्वसामान्य जागेसाठी कोणत्याही जातीतील पात्र व्यक्ती भाग घेऊ शकते. आरक्षित जागेसाठी मात्र त्याच जातीतील व्यक्तीस परवानगी असते. त्यामुळे इतर जातींना आरक्षण दिले असे म्हणण्यापेक्षा मराठ्यांना किंवा खुल्या वर्गांना प्रतिबंध केला असे म्हणणे योग्य होईल. हा अन्याय, पात्रता असूनही नाकारल्याची भावना, विशिष्ट जातीचा म्हणून हुकलेली संधी, फक्त मराठा आहे म्हणूनच. या परिस्थितीस आम्ही मराठेदेखील काहीअंशी कारणीभूत आहोत. कोणताही सारासार विचार न करता एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा राबवायचा हा खेळ मराठ्यांना महागात पडला. मराठा नेत्यांचेच अनेक पक्ष झाले व त्यांमध्ये मराठा समाज विभागला गेला. एकमेकांवर कुरघोडी करीत राहिला. अशा पक्षांत काही अल्पसंख्याक समाजाचे लोक आले व पक्षात राहूनही स्वतंत्र जातीमुळे अस्तित्व ठेवून त्याच पक्षामार्फत आपल्या जातीच्या लोकांचा विचार करू लागले. मराठा नेते मात्र मराठा आहोत, मोठ्या भावाची जबाबदारी जास्त असते. आधी समाजाला दिले पाहिजे, असे गोंडस उत्तर देऊन मराठ्यांच्या जिवावर राजकीय कारकिर्द चालू ठेवत राहिले. या सर्व बाबी हळूहळू बाहेर येत त्यांचे रूपांतर असंतोषामध्ये झाले. मराठ्यांच्या पूर्वेतिहासानुसार सर्व समाजाची जबाबदारी आपल्यावरच आहे, असा विचार करून मोर्चाने बाहेर पडत आहे. यापुढे जातीपातींचे राजकारण होणार नाही मोर्चामध्ये सामील होत असलेले मराठे व त्यांना पाठिंबा देणारे इतर समाज या सर्वांचे एकमत झाले आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीचे पाठबळ नको, मोर्चात राजकीय अस्तित्व नको, कोणत्याही पक्षाचा अजेंडा नको, हा प्रस्थापित मराठा नेत्यांना खूप मोठा इशारा आहे. यापुढे जातीपातीचे राजकारण होऊ शकणार नाही. मराठा समाजास प्रत्येक वेळी सबुरीने घ्या, असा सल्लादेखील चालणार नाही. मराठ्यांची मागणी योग्य व इतर जातींच्या विरुद्ध नाही.