येथील संभाजीनगर (ओतवाडी) परिसरातील गट नंबर ६६, ६७ जागा ही शासनाच्या मालकीची असून, या जागेवर स्थायिक असणाऱ्या ग्रामस्थांना जागा देऊन उर्वरित जागा मराठा समाजाला मराठा भवन व त्याच्या उपक्रमासाठी द्यावी, याबाबतची कागदपत्रांची पूर्तता केली आहे. धनवडे म्हणाले की, मराठा समाजाला जागा देणेबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत यापूर्वी ठराव करण्यात आला आहे. त्यास अनुसरून शासनस्तरावर आम्ही आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असल्यामुळे लवकरच ती जागा मराठा समाजाला मिळणार आहे. या जागेवर मराठा समाजाच्या माध्यमातून भविष्यात व्यायामशाळा, क्रीडांगण व सांस्कृतिक सभागृह आदी उपक्रम राबविण्यात येणार असून ही जागा सर्वासाठी खुली राहणार आहे. या वेळी पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका युवासेनाचे तालुका अध्यक्ष प्रतीक धनवडे, अजय कंदले, शंभू सेना जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद धनवडे, सुरेश शिंदे, दत्तात्रय मोरबाळे, सारंग चव्हाण, किरण मुडशिंगे आदी मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नृसिंहवाडी येथील जागा मराठा समाजाला मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST