शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमजाई व्हरवडे ‘पेयजल’ची चौकशी होणार

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

४९ लाख रुपयांच्या या योजनेच्या अनेक कामाला अजून सुरूवातच झालेली नाही.

सुनील चौगले -आमजाई व्हरवडे --आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेच्या कामाबद्दलच्या तक्रारींची जि.प.ने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची चार पाच दिवसांत चौकशी पूर्ण केली जाणार असून, खरोखर या पेयजल योजनेत गैरकारभार झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एस. शेंडे यांनी सांगितले.आमजाई व्हरवडे येथे गेल्या दोन-तीन वर्षांपासून पेयजल योजनेचे काम सुरू आहे. ४२ लाख रुपये मंजूर असलेल्या या योजनेचे काम पूर्ण होण्याअगोदरच काही पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी संगनमताने ग्रा.पं.च्या बॅँक खात्यातून उचल केल्याचे उघड झाले आहे. ग्रामसभेत ठराव करूनसुद्धा रकमेची उचल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पेयजल योजनेच्या कमिटीतील चौदा सदस्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे लेखी तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.जि.प.च्या संबंधित विभागाकडून या प्रकरणाच्या चौकशीला आजपासून सुरूवात केली असून, या चौकशीचा अहवाल चार ते पाच दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ४९ लाख रुपयांच्या या योजनेच्या अनेक कामाला अजून सुरूवातच झालेली नाही. नवीन टाकीत तर पाणीच पडलेले नाही. नवीन झालेल्या या योजनेत ३० टक्के सुद्धा नवीन पाईपलाईन केलेली नाही. जुन्या पाईपलाईनचे नवीन जॅकवेलमधून पाणी सुरू केले जाते. मग रक्कम उचल झाली असताना पाईपलाईनची रक्कम कोठे गेली, याबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.