शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सॅफ गेम्सचा ‘मस्तीखोर गेंडा’ कोल्हापूरचा

By admin | Updated: December 20, 2015 01:42 IST

‘निर्मिती’चा पुन्हा झेंडा : शुभंकर संकल्पनेत प्रथम पारितोषिक

कोल्हापूर : बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा फेबु्रवारीत आसाम येथे होत आहेत. या स्पर्धांसाठी केंद्र शासनाने ‘मॅस्कॉट’ अर्थात ‘शुभंकर’ संकल्पनेची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये कोल्हापूरच्या ‘निर्मिती ग्राफिक्स’ने पाठविलेल्या ‘तिखोर (मस्तीखोर) गेंडा’ या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले. स्पर्धेच्या निमित्ताने हा ‘तिखोर’ स्पर्धेतील सहभागी देशांत झळकणार आहे, अशी माहिती ‘निर्मिती’चे अनंत खासबारदार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. हा शुभंकर तयार करण्यात त्यांना संकल्पक शिरीष खांडेकर यांना सुशांत सासने या सहकाऱ्यांनी कलापूर्ण साथ दिली. खासबारदार म्हणाले, ही स्पर्धा आसाममध्ये प्रथमच होत आहे. त्यानिमित्त सप्टेंबर २०१५ मध्ये ‘शुभंकर’ या संकल्पनेची स्पर्धा केंद्र सरकारने आयोजित केली होती. यामध्ये देशातील ४५०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आसाममध्ये एकशिंगी गेंडा हे शुभ प्रतीक मानले जाते. त्यामुळे ‘भारतीय खेळ प्राधिकरणाने’नेही ते स्वीकारले आहे. ‘तिखोर’ हा मस्तीखोर, अल्लड व चपळ असतो. शुभंकरसाठी प्रथम आम्ही पळणारा, फुटबॉल खेळणारा, गेंडा, आदी प्रकारची संकल्पना प्राधिकरणापुढे मांडली होती. त्यातून मस्तीखोर तिखोर गेंडा या कल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले. या मस्तीखोर तिखोर शुभंकरचे उद्घाटन १३ डिसेंबरला केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल व आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्या हस्ते झाले. विख्यात संगीतकार भूपेंद्र हजारिका यांचे थीम साँग या तिखोरसोबत वाजणार आहे. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका या देशांसाठी २६ क्रीडाप्रकार असणारी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या सहभागी देशांतही हा तिखोर अर्थात मस्तीखोर गेंडा झळकणार आहे. २००७ साली आसाममध्ये झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘रंगमान’ हा शुभंकर आसामी गेंडा होता. त्यात सुधारणा होऊन रंगमानचा ‘तिखोर’ हा नव्या स्वरूपात व नव्या दिमाखात सादर झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर ‘अनंत’ यश.. ‘निर्मिती’ने सादर केलेल्या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. यामध्ये मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या संकल्पनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन’ या संकल्पनेलाही पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘इंडो-आफ्रिका हायड्रो समिट’मध्येही संधी मिळाली होती आणि आता तिखोरच्या संकल्पनेलाही यश मिळाले आहे.