हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी लाखाचा धनादेश वितरण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संचालक वीरेंद्र मंडलिक प्रमुख उपस्थितीत होते.
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाची आर्थिक परवड होऊ नये यासाठी ही विमा योजना सुरू केली आहे.
अपघाती मयत झालेल्या बामणी (ता. कागल) येथील बळवंत तुकाराम पाटील व गोरंबे येथील तुकाराम गणपती गोडसे यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. या वेळी संचालक शिवाजीराव इंगळे, धनाजी बाचणकर, मारुतीराव काळूगडे, शहाजी यादव, नंदकुमार घोरपडे, सर्जेराव पाटील, सौ. राजश्री चौगुले यांसह सर्व संचालक, कारखान्याचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
कॅप्शन -
सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारसांना अपघाती विमा क्लेमचा धनादेश देताना उपाध्यक्ष बापूसो भोसले-पाटील, संचालक वीरेंद्र मंडलिक, धनाजी बाचणकर.
छाया-जे के फोटो, सुरुपली