शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक मंडळांकडून मांडव उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:27 IST

कोरोना संकटाच्या काळातही कोल्हापुरातील मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीची परंपरा जपत यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी लहान आकारांतील मांडव उभारले जात आहेत.

ठळक मुद्देसार्वजनिक मंडळांकडून मांडव उभारणी सुरू गणेशोत्सवाची तयारी : यंदा वर्गणीला दिला फाटा

कोल्हापूर : कोरोना संकटाच्या काळातही कोल्हापुरातील मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीची परंपरा जपत यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी लहान आकारांतील मांडव उभारले जात आहेत.मुंबई, पुणे आणि कोकणानंतर कोल्हापुरातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक आणि पुरोगामी वारसा लाभल्याने येथील गणेशोत्सवाचे देखावेदेखील आगळेवेगळे, आकर्षक पण प्रबोधन करणारे असतात. हे देखावे पाहण्यासाठी ग्रामीण व शहरातील नागरिक रस्त्यांवर येतात. त्यासाठी महिनाभर आधीपासूनच मंडळांची लगबग सुरू होते. मात्र गेल्या वर्षीपासून हे चित्रच पालटले आहे.

गतवर्षी गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीच महापूर येऊन मोठे नुकसान झाले होते; त्यामुळे उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यावर्षी तर कोरोनाने नागरिकांना जणू घरातच डांबून ठेवले आहे, सगळीकडे संसर्गाची धास्ती आहे, भोवतालचे नागरिक बाधित आहेत, अर्थव्यवस्थेची चाके रुतली आहेत.

या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव आला आहे, त्यात आता महापुराचीही भीती आहे. या सगळ्या संकटांचा सामना करीत यंदा नागरिक हा उत्सव साजरा करीत आहेत. कोल्हापुरातील गणेशोत्सवात मोठ्या गणेशमूर्ती हे महत्त्वाचे आकर्षण असते; पण शासन, प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार यंदा सर्वच मंडळांनी चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती ठरवल्या आहेत; तर काही मंडळांनी प्रतीकात्मक म्हणून एक-दीड फुटाची मूर्ती ठरवली आहे.यंदा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत नसल्याने मंडळांनी वर्गणीही मागितलेली नाही. वातावरण भीतीचे असले तरी गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेची परंपरा मंडळांनी अबाधित राखली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंडळांच्या वतीने लहान आकारातील मांडव उभारणी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी मांडव उभारले जात आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर