शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वसूचना न देताच बांधकामे हटवण्याचे आदेश- मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:24 IST

मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना लांजा शहरातील व्यापारी व जमीनमालक यांना प्रशासनाने पूर्वसूचनेची नोटीस तसेच जमीनमालकांना जमिनीचा मोबदला अदा न करता, रविवारी सकाळी ध्वनिक्षेपकाद्वारे

ठळक मुद्देलांजात संताप, रविवारी सूचना दिल्या, सोमवारपर्यंत बांधकामे खाली करण्याचे आदेश

लांजा : मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना लांजा शहरातील व्यापारी व जमीनमालक यांना प्रशासनाने पूर्वसूचनेची नोटीस तसेच जमीनमालकांना जमिनीचा मोबदला अदा न करता, रविवारी सकाळी ध्वनिक्षेपकाद्वारे शहरातील व्यापारी,  खोकेधारक, फेरीवाले यांनी  २६ नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने अधिग्रहण केलेली जागा खाली करावी, अशा सूचना दिल्याने लांजातील संतप्त व्यावसायिकांनी प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. दरम्यान आमदार राजन साळवी यांना याविषयीची माहिती मिळताच त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना ४ डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही बांधकामाला हात लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत. 

मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. हा महामार्ग लांजा बाजारपेठेच्या मध्यातून जात असल्याने महामार्गावर दुतर्फा असलेले छोटे - मोठे ४०० ते ५०० व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत.

या व्यावसायिकांची रोजी-रोटी कायमची बुडणार आहे. महामार्ग प्रकल्पबाधित कृती समिती, लांजा यांनी वेळोवेळी प्रशासन व संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन शहरातून बायपास मार्ग काढावा अथवा हे शक्य नसल्यास साडेबावीस मीटरचे अंतर हे बाजारपेठे पुरते कमी करुन १८ मीटर करावे तसेच बाजारपेठेपुरता सिंगल पिलरवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच खोकेधारक व व्यापारी यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, संबंधित यंत्रणेकडून यावर कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी येथील व्यापारी, फेरीवाले, खोकेधारक यांची दिशाभूल करण्यात आली आहे.

रविवारी ध्वनिक्षेपकाद्वारे व्यापारी, खोकेधारक यांना  २६ डिसेंबरपर्यंत आपले खोके, गाळे मोडून जागा मोकळी करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्याने सर्वजण संतप्त झाले आहेत.  दरम्यान, याची माहिती आमदार राजन साळवी यांना समजताच त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दूरध्वनीवरून ४ डिसेंबरपर्यंत बाजारपेठेतील बांधकामाला हात लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत. रविवारी बाजारपेठेतील व्यापारी, खोकेधारक, फेरीवाले यांच्यासमवेत मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पबांधित कृती समिती व व्यापारी संघटना यांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबई