शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मँचेस्टर’, कारंडे गटाचा सावध पवित्रा

By admin | Updated: October 20, 2016 01:23 IST

इचलकरंजी नगरपालिका : भाजपप्रणीत शहर विकास आघाडी, कॉँग्रेस पर्याय; प्रभागनिहाय चाचपणीनंतर भूमिकेचा निर्णय

इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस किंवा शहर विकास आघाडीबरोबर समझोता करण्यासाठी मॅँचेस्टर आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. भाजपप्रणीत शहर विकास आघाडी व कॉँग्रेस असे दोन पर्याय असले तरी प्रभागनिहाय परिस्थितीची चाचपणी करून निर्णय घेण्याची भूमिका दोघांचीही आहे.नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागांत उमेदवार उभे करण्याची तयारी भाजप व शहर विकास आघाडीची आहे. कोल्हापूरप्रमाणे पॅटर्न राबविण्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यांनी तीन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे, तर राष्ट्रवादीतील जांभळे गटाने कॉँग्रेसकडे प्रभाग क्रमांक १, ४, ५, ६ व ८ या ठिकाणी जागा लढविण्यासाठी केलेल्या मागणीवर कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही. पक्षश्रेष्ठींबरोबर विचारविनिमय करून हा विषय निर्गत होईल, असे कॉँग्रेसकडून सांगण्यात आले.मॅँचेस्टर आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी दोन तास बैठक झाली. बैठकीमध्ये आघाडीकडून लढविण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या प्रभागनिहाय स्थितीचा विचार करण्यात आला. मॅँचेस्टर आघाडीचे उमेदवार ज्या प्रभागात उभे राहणार आहेत, तेथे काही ठिकाणी शहर विकास आघाडी, तर काही ठिकाणी कॉँग्रेसचे उमेदवार अनुकूल आहेत. त्यामुळे मॅँचेस्टर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर नवीनच पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. तरीसुद्धा आज, गुरुवारचा दिवस थांबून उद्या, शुक्रवारी पुन्हा व्यापक बैठक घेण्यात येईल आणि अंतिम निर्णय देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांनी दिली.राष्ट्रवादीतील कारंडे गटाची बैठक बुधवारी सायंकाळी विक्रमनगर येथे झाली. बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक विठ्ठल चोपडे व माजी नगरसेवक उदयसिंह पाटील उपस्थित होते. या गटाच्या बैठकीतसुद्धा प्रभागनिहाय उमेदवार उभे करण्याकरिता असणाऱ्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. कॉँग्रेसबरोबर करावयाची आघाडी नैसर्गिक असली तरी निवडणुकीनंतर जांभळे गटाबरोबर पुन्हा संघर्ष करावा लागेल, तर शहर विकास आघाडीबरोबर युती करताना त्यांच्या नगराध्यक्षपदासाठी असलेल्या उमेदवाराच्या कमळ चिन्हाचा प्रचार करावा लागेल, अशी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीची राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर आज चर्चा करावी आणि उद्या, शुक्रवारी व्यापक बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, असे निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)कॉँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदावरून संघर्ष?नगरपालिका निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार शहर कॉँग्रेस समितीकडून ठरविला जावा, अशी भूमिका माजी मंत्री आवाडे यांच्या गटाची आहे, तर माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्याकडून त्यांचे पुत्र संजय आवळे यांची उमेदवारी प्रदेश कॉँग्रेसकडून लादली जाईल. मात्र, कॉँग्रेस अंतर्गत असलेल्या या दोन गटांत विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत असल्यामुळे पुन्हा आवाडे व आवळे या दोन गटांत संघर्ष होण्याची चिन्हे असल्याची येथील राजकीय क्षेत्रात चर्चा आहे.