शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

पैशांसाठी मालती पाटीलचा खून

By admin | Updated: December 7, 2015 00:53 IST

संशयित आरोपीची कबुली : रांगणागडच्या शंभर फूट दरीत दिले फेकून; मृतदेह ४८ तासांनंतर बाहेर

कोल्हापूर : नागाळा पार्क परिसरातून बेपत्ता झालेल्या मालती रामगौंडा पाटील (वय ५२) हिचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मालती ही आपली प्रेयसी होती. तिने मुलीच्या नावे बँकेत ठेवलेले ५७ लाख रुपये आपल्याला देण्यास नकार दिल्याने भुदरगड येथील रांगणागडाच्या शंभर फूट दरीत फेकून तिचा खून केल्याची कबुली संशयित आरोपी संतोष गंगाराम मर्गज (३५, रा. संभाजीनगर) याने दिली आहे. दरम्यान, मालती पाटील हिचा मृतदेह ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने दरीतून बाहेर काढण्यात आला. संशयित आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील कपडे जाळल्याचे घटनास्थळावर दिसून आले, अशी माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबतची अधिक माहिती अशी, मालती पाटील व संतोष मर्गज हे दोघेही नागाळा पार्क येथील उद्योगपती विलास आनंदराव ढोमके यांच्या बंगल्यात कामास होते. १४ नोव्हेंबरला दोघेही बेपत्ता झाले होते. याबाबत ढोमके यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मालती व संतोष बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने मालवण येथून संतोषला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मालतीबाबत चौकशी केली असता त्याने ती आपल्यासोबत पळाल्याचे मान्य करीत आपण भुदरगड येथील रांगणागडावर फोटो काढत असताना ती दरीत कोसळल्याची माहिती दिली. परंतु, संतोषने तिचा खून करून मृतदेह दरीत टाकल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. पोलीस निरीक्षक चौधरी यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने खुनाची कबुली दिली.आरोपीने प्लॅन करून केला गेमसंतोष मर्गज व मालती पाटील यांचे प्रेमसंबंध होते. मालती हिने मुलीच्या नावे बँकेत ५७ लाख रुपये ठेवले होते. त्यावरून संतोष हा तिच्याशी वारंवार भांडण करीत होता. ती आपल्याला पैसे देणार नाही, याची खात्री झाल्यानंतर त्याने दिवाळीच्या भाऊबिजेदिवशी तिला संपविण्याचा प्लॅन आखला. ‘भुदरगड येथील रांगणागडावर गुप्तधन आहे. ते काढून आपण एकमेकाला वाटून घेऊ’, असा बनाव करून भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिला दुचाकीवरून घेऊन तो त्या ठिकाणी आला. तिचा विश्वास बसण्यासाठी येथे एका ठिकाणी खुदाई केली. खुदाईसाठी मालतीनेही मदत केली. मात्र, गुप्तधन सापडत नाही, याची खात्री झाल्यानंतर मालतीने ‘तू मला खोटे का सांगितलेस’ म्हणून त्याला विचारणा केली. यावेळी ‘मुलीच्या नावे बँकेत ठेवलेले पैसे मला काढून दे’, असे त्याने म्हटल्यानंतर तिने ठामपणे नकार दिला. यावेळी त्याने तिच्या नाकावर ठोसा मारताच ती रक्तबंबाळ होऊन खाली बसल्यानंतर तिला ओढत शंभर फूट दरीमध्ये फेकून दिले. त्यानंतर दरीमध्ये उतरून तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून ते त्याच ठिकाणी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेथून तो दुचाकीवरून मालवण येथे आला. दरम्यान, त्याने पोलिसांना गुप्तधनासाठी खोदलेली जागा, तिला मारहाण केली ते ठिकाण व दरीत फेकून दिल्याचे घटनास्थळ स्वत: दाखविले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ४८ तासांच्या अथक प्रयत्नाने मालतीचा मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह तिचाच आहे, हे तिच्या पतीने व नातेवाइकांनी ओळखले. या खून प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.लाखो रुपये आले कोठून? मालती पाटील ही उद्योगपतीच्या घरी कामाला होती. तिने मुलीच्या नावे बँकेत ५७ लाख रुपये ठेवल्याचे संतोष याने सांगितले, परंतु लाखो रुपये तिच्याकडे कोठून आले? याची पोलिसांनाही शंका आहे. ती रक्कम आहे की संतोष खोटे बोलत आहे, याबाबतची खात्री पोलीस करीत आहेत.