शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

नियोजनाअभावी मलकापूर एस. टी. आगाराची चाके खोलातच

By admin | Updated: November 27, 2014 00:15 IST

आर्थिक गणित काही जुळेना : गाड्यांची कमतरता, वाहक-चालकांची पदे रिक्त

राजाराम कांबळे - मलकापूर -मलकापूर एस. टी. आगारात नियोजनाचा अभाव, समांतर धावणाऱ्या गाड्या, मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक याबरोबरच आगारात गाड्यांची कमतरता व चालक व वाहक यांची रिक्त पदे यामुळे या आगाराचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम भागात असणाऱ्या एस. टी. डेपोला उर्जितावस्थेत आणण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी होत आहे.शाहूवाडी तालुक्यात माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने मलकापूर एस.टी. आगार चालू झाला. पहिले दहा ते पंधरा वर्षे हा एस.टी. डेपो नसल्यात होता. कालांतराने महाराष्ट्रातील संपूर्ण एस.टी.चा डोलारा हळूहळू कोसळत गेला. यामध्ये मलकापूर आगाराला खासगी वाहतुकीचा सर्वांत मोठा फटका बसला व डेपो तोट्यात चालू लागला.शाहूवाडी तालुक्यात १३१ गावे २५० वाड्यावस्त्यांतून तालुका विभागाला आहे. कच्चे रस्ते यामुळे एस.टी.ला अनेक प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे. मलकापूर आगाराकडे सध्या ५९ गाड्यांची आवश्यकता आहे. मात्र नऊ ते दहा या जुन्या गाड्यांवर येथील कारभार सुरू आहे.येथे २२ चालकांची कमतरता आहे. मात्र ड्युटीवर असणाऱ्या चालकांवर ताण पडत आहे. तर जिल्ह्यात २७४ चालकांची रिक्त पदे आहेत. दररोज ४३०० कि.मी. अंतर रद्द होऊन ११ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाला ५१ हजार रुपये प्रवासी कर मिळत नाही. मलकापूर आगाराला ऊर्जितावस्था आणावयाची असल्यास येथे नवीन गाड्या पुरविल्या पाहिजेत. तातडीने येथील चालक-वाहकांची पदे भरली पाहिजेत. जनता गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली पाहिजे. त्याचबरोबर अनियमित बससेवा असल्याने प्रवासी वर्ग एस.टी. पासून लांब जात असल्याचे चित्र आहे. अनेकदा एकाचवेळी एकाच मार्गावर तीन-चार गाड्या धावतात, तर अनेकवेळा तासन्तास गाड्यांची वाट पहात बसावे लागते. ग्रामीण भागात एस.टी. वेळेवर सोडली पाहिजे. खासगी वाहतुकीवर शासनाने निर्बंध आणले पाहिजेत. तरच मलकापूर एस.टी. डेपोला ऊर्जितावस्था प्राप्त होईल.शासनाने दुर्गम व ग्रामीण भागातील एस.टी. डेपोसाठी विशेष पॅकेज देऊन सर्वसामान्यांची एस.टी. वाचली पाहिजे. तर येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली एस.टी. म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली पाहिजे. शाहूवाडी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी शासन दरबारी मलकापूर आगाराविषयी प्रश्न मांडून सर्व सर्वसामान्यांचा डेपो वाचविण्याची मागणी जोर धरत आहे.