मलकापूर : भ्रष्टाचारमुक्त कारभार करून शहरवासीयांंना लाभदायक ठरणारी पालेश्वर पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन पालिकेचे आघाडीप्रमुख जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी केले. मलकापूर पालिकेत नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांचा पदग्रहण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती पंडितराव नलवडे होते. प्रारंभी सभापती पंडितराव नलवडे, सर्जेराव पाटील, शामराव कारंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापण्यात आली. सभापती पंडितराव नलवडे म्हणाले, भ्रष्टाचार शब्दच आपल्या मनातून काढला पाहिजे. जनतेच्या सेवेचे व्रत स्वीकारावे. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पंडितराव नलवडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव कारंडे, दलित महासंघाचे रमेश चांदणे, विश्वास लोखंडे, शोभा मिरजकर, सुरेश भोगटे यांनी मनोगत व्यक्त केले. शहराचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभारातून आपल्यावर जनतेने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना घरठाण उतारा आॅनलाईन मिळण्याची सोय सत्ताधारी आघाडीने केली आहे. त्याचेदेखील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. नगरसेवक राजू प्रभावळकर, अशोक देशमाने, भारत गांधी, मानसिंग कांबळे, सोनिया शेंडे, नम्रता कोठावळे, अश्विनी लोखंडे, मीनाक्षी गवळी, मधुकर लाड, संजय पाटील, कृष्णा पाटील, नंदकुमार कोठावळे, भाई शिंदे, सुभाष पाथरे, रमेश पडवळ, अनिल कांबळे, शोभा मगर, बाबूराव गांधी, ए. के. पाटील उपस्थित होते. राजू प्रभावळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मलकापूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यालय प्रवेश जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांच्याहस्ते झाला. यावेळी शामराव कारंडे, पंडित विभूते, अमोल केसरकर उपस्थित होते.
मलकापूर शहर भ्रष्टाचारमुक्त करणार
By admin | Updated: January 3, 2017 23:39 IST