शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

"मतदार यादी बिनचूक करा, नवमतदारांची संख्या वाढवा"

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 13, 2023 20:23 IST

सौरभ राव : मतदार नोंदणी आढावा बैठकीत सूचना.

कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी बिनचूक तयार करा, नाव नोंदणी व नाव वगळणे या दोन्ही बाबींवर काटेकोर लक्ष ठेऊन प्रक्रिया पूर्ण करा. नवमतदारांमध्ये जागृती, प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील आयडॉल व्यक्तींची मदत घ्या अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी राव यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत सुरू असलेल्या जागरुकता अभियानाची माहिती घेतली.

सौरभ राव म्हणाले, नवमतदारांमध्ये जागृती करण्यासाठी जलतरणपटू वीरधवल खाडे, बाळूमामा मालिकेतील अभिनेते सुमीत पुसावळे, शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले यांचे सहकार्य घ्या. मतदार यादी अधिकाधिक बिनचूक करा. मतदार यादीत नाव घालणे, वगळणे, मयतांची नावे वगळणे, अन्य दुरुस्ती, दुबार मतदारांची एकाच ठिकाणी नोंदणी अशा सर्व अर्जांची निर्गत करा. मतदार यादी दुरुस्तीबाबत आलेले अर्ज : ८६ हजार ८

निर्णय झालेले अर्ज : ३७ हजार २८४निर्णय प्रक्रियेत असलेले अर्ज : ४७ हजार ६४९ एका मोहिमेत १६ हजार नवमतदार

नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहिमा घेतल्या जात आहे. याअंतर्गत झालेल्या पहिल्याच मोहिमेत जिल्ह्यात १६ हजार ५०७ नवमतदारांची नोंदणी झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर