शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बस दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करु : चंद्रकांतदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 18:17 IST

कोल्हापूर : पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेतील जखमींची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णांची विचारपूस केली, तसेच दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तानाजी साठे व सुजय अवघडे या दोघांच्या राजारामपूरीतील निवासस्थानी दुपारी भेट देऊन त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे सात्वन केले. दरम्यान, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन ...

ठळक मुद्देमृतांच्या कुटूंबांचे सात्वन; जखमींची विचारपूसअमल महाडिक, माजी आमदार राजीव आवळे यांचीही भेटशासकिय मदतीसाठीही प्रयत्न

कोल्हापूर : पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेतील जखमींची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णांची विचारपूस केली, तसेच दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तानाजी साठे व सुजय अवघडे या दोघांच्या राजारामपूरीतील निवासस्थानी दुपारी भेट देऊन त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे सात्वन केले. दरम्यान, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन सर्व दोषीवर कारवाई केली जाईल असे आश्वासन मंत्री पाटील यांनी नातेवाईक आणि परिसरातील नागरीकांना दिले.

गंगावेश मार्गावर ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घसल्याने तानाजी साठे आणि सुजय अवघडे यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन कुटूंबांचे सात्वन केले.

यावेळी साठे व अवघडे कुटूंबियांच्या नातेवाईकांनी व नागरीकांनी या घटनेची चौकशी करावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी चंद्रकांतदादा यांना परिसरातील संतप्त नागरीकांनी घेरावा घालून प्रश्नांचा भडीमार केला.

त्यावेळी मंत्री पाटील यांनी, या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय विसर्जन मिरवणुक सुरु असताना या मार्गावरील केएमटीसह अवजड वाहतूक बंद का केली नाही याबाबत उच्चस्तरीय चौकशी करु, तसेच सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या दुर्घटनेत कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्यांना रोजगारभिमूख पाटबळ देण्याची कारवाई तातडीने करण्यात येईल असेही चंद्रकांतदादा म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पो. नि. संजय साळुंखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई आदी उपस्थित होते.

शासकिय मदतीसाठीही प्रयत्न

सोमवारी सकाळी मंत्री पाटील यांनी अ‍ॅष्टरआधार, सीटी हॉस्पीटल तसेच सीपीआर रुग्णालयात जाऊन बस दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. त्यावेळी जखमींना औषधोपचारासाठी एकही रुपया खर्च करु देणार नाही, आवश्यक वाटल्यास जखमींवर मुंबईतील नामवंत हॉस्पीटलमध्ये उपचार करु असेही आवश्वासन मंत्री पाटील यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिले.

महापालिकेच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना ५ तर जखमींच्या नातेवाईकांना १ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे तरीही शासनाच्यावतीने मदत देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

महाडीक, आवळें यांचीही भेट

सोमवारी सकाळी आमदार अमल महाडिक यांनी सीपीआर रुग्णालयात बस दुर्घटनेतील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तर माजी आमदार राजीव आवळे यांनी या दुर्घटनेतील मृत झालेल्या तानाजी साठे व सुजय अवघडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.