शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी मोठा प्रकल्प कोल्हापुरात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:03 IST

नेसरी : शेतकºयांच्या प्रत्येक जमिनीची पोत तपासणी, चांगले बी-बियाणे, खते द्यायचे नियोजन असून पशुधन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पादन वाढणार नाही. शेतकºयांचे टाकाऊ पिंजार, पालापाचोळा, उसाचा पाला असे काहीही वाया जाऊ नये यासाठी देशामध्ये ६ ठिकाणी मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. पैकी १ प्रकल्प कोल्हापुरात आणणार आहे, अशी माहिती ...

नेसरी : शेतकºयांच्या प्रत्येक जमिनीची पोत तपासणी, चांगले बी-बियाणे, खते द्यायचे नियोजन असून पशुधन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पादन वाढणार नाही. शेतकºयांचे टाकाऊ पिंजार, पालापाचोळा, उसाचा पाला असे काहीही वाया जाऊ नये यासाठी देशामध्ये ६ ठिकाणी मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. पैकी १ प्रकल्प कोल्हापुरात आणणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रमेशराव रेडेकर फौंडेशन अंतर्गत समृद्ध शेतकरी अभियानच्या ई-मोबाईल पशुचिकित्सालय लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष शेतकरी नेते पाशा पटेल, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतीपासून महानगरपालिका जिंकण्याचा सपाटा लावला आहे. लोक काँगे्रसला कंटाळलेले असून कर्नाटक भाजपने जिंकल्यात जमा आहे, असेही ते म्हणाले.पाटील म्हणाले, रेडेकर यांनी सुचविलेल्या ५० खाटांचा दवाखाना, हिरण्यकेशीतील पाणी नरेवाडी बंधाºयात व चंदगड पूर्व भागातील जनतेच्या पाण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.आमदार हाळवणकर म्हणाले, चंदगड मतदारसंघातील सगळे प्रकल्प मार्गी लावू. दौलत कारखान्यात मुश्रीफ यांनी राजकारण केले व कारखाना बंद पाडला. तेव्हा आता डिजीटल नेतृत्व नको आहे, असा टोला डॉ. नंदाताई बाभूळकर यांना मारून चंदगडचा आमदार भाजपचाच असेल, अशी ग्वाही दिली. यावेळी अमल महाडिक यांचेही भाषण झाले.रमेश रेडेकर म्हणाले, गरीब व गरजूंसाठी ५० खाटांचे रुग्णालय उभारावे आणि ३५८ गावांतील रस्ते, वीज व पाण्यासाठी ३०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. ई-मोबाईल व्हॅन प्रत्येक जि. प. मतदारसंघात देणार असल्याचेही रेडेकर यांनी सांगितले.प्रारंभी पालकमंत्र्याच्याहस्ते गाडी चालवून ई-मोबाईल पशुचिकित्सालय व्हॅनचा प्रारभ झाला. यावेळी अशोक चराटी, गोपाळराव पाटील, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जि. प. सदस्या सुनीता रेडेकर, आजरा अर्बन अध्यक्ष विलास नाईक, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. अनिल देशपांडे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, सभापती जयश्री तेली, बाबा देसाई, लक्ष्मणराव शिंगटे, प्रा. सुधीर मुंज, मलिक बुरूड, दयानंद चौगुले, बाबूराव पाटील आदी उपस्थित होते.त्यांना आठ हत्ती आणावे लागतीलकोल्हापूरला ४०० कोटी आणा, हत्तीवरून मिरवणूक काढतो म्हणणाºयांनी मी ४००० कोटींची विकासकामे केली आहेत. तेव्हा आता त्यांना ८ हत्ती आणावे लागतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी हाणला.