शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

माकडहाडच सांगेल ‘त्याचं’ नाव-गाव!

By admin | Updated: May 21, 2015 00:13 IST

‘डीएनए’च अंतिम : कोल्हापुरातील मृतदेह लहूचाच की जाणीवपूर्वक दिशाभूल?

राजीव मुळ्ये - सातारा-- दोन लहानग्यांना खंडणीसाठी पळवून नेऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला क्रूरकर्मा लहू ढेकाणे याचा शिरच्छेद केलेला मृतदेह अचानक सापडतो आणि खळबळ उडते. मृतदेहाचे दोन्ही हातांचे पंजेही गायब असतात. भावाने लहूचा मृतदेह ओळखला तरी अनेक कारणांनी पोलिसांना भरवसा वाटत नाही. मग हे गूढ उलगडणार कसं? मृतदेहाचं माकडहाड याकामी मोठी भूमिका बजावेल; कारण ‘डीएनए’ चाचणीच मृतदेहाच्या ओळखीसाठी एकमेव धागा आहे.कोल्हापूरजवळ माळरानावर सापडलेला मृतदेह लहू ढेकाणेचा असावा, हे त्याच्या खिशातली डायरी, त्यातले भाऊ-वहिनीचे नंबर आणि लहूच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स यावरून दिसून येत असले तरी जोपर्यंत शिर सापडत नाही, तोपर्यंत हा दिशाभुलीचा प्रयत्न असू शकतो, हे पोलीस नजरेआड करू शकत नाहीत. कारण लहानग्या मुलाचा गळा त्याच्याच बुटाच्या लेसने आवळणाऱ्या क्रूरकर्मा लहूने पोलिसांना यापूर्वी अनेकदा गुंगारा दिला आहे. त्याला पकडण्यासाठी नकली नोटांची बॅग ठेवून लावलेल्या सापळ्यातून तो बॅग घेऊन निसटला होता. अटकेनंतर तो पोलीस कोठडीतून पळाला होता आणि बऱ्याच दिवसांनी पुण्याच्या मार्केट यार्डात सापडला होता. शिक्षा भोगत असताना पॅरोलवर आॅक्टोबरमध्ये सुटलेला लहू नोव्हेंबरमध्ये तुरुंगात हजर होणे अपेक्षित होते; परंतु तो मेपर्यंत हजर झाला नाही. या सगळ्या बाबी पाहता, पोलिसांनी तिसरा डोळा उघडाच ठेवला आहे.मृतदेह सापडलेल्या परिसरात श्वान घुटमळते, मृतदेहाचे डोके आणि हात सापडत नाहीत, त्याच्या कपड्यांवर रक्ताचा थेंबही दिसत नाही. मतदान ओळखपत्रही लोक कायम जवळ बाळगत नाहीत. डायरीत केवळ दोनच नंबर कसे आढळतात, हाही प्रश्नच! अशा अनेक गोष्टी संशय निर्माण करणाऱ्या असताना मृतदेहाची शास्त्रोक्त ओळख पटविणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी ‘डीएनए’ चाचणीचाच एकमेव पर्याय पोलिसांसमोर आहे. मानवी कवटी काही दिवस रसायनात ठेवून मृताचा फोटो आणि कवटी यांच्यातील साधर्म्य तपासता येते. मात्र, जिथे शिरच गायब आहे, तिथे ही चाचणी करणार कशी? अटकेनंतर आरोपीच्या बोटांचे ठसे घेतले जातात. लहूच्या कथित मृतदेहाचे हात तोडले जाणे हे या पार्श्वभूमीवर संशयास्पदच ठरते. म्हणूनच ‘डीएनए’ चाचणीचा एकमेव पर्याय आहे. भावाचाच रक्तनमुना उपयुक्त‘डीएनए’ चाचणीसाठी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींचे रक्तनमुने घेतले जातात. त्यातल्या त्यात आईचा रक्तनमुना अधिक उपयुक्त असतो. आई नसल्यास वडील आणि तेही नसल्यास भावाचा रक्तनमुना घेतला जातो. लहूच्या आई-वडिलांचे निधन झाले असल्याने भाऊ अंकुश याच्या रक्तनमुन्याचाच एकमेव पर्याय पोलिसांपुढे आहे.अशी होते ‘डीएनए’ चाचणी१ मृताचे कोणतेही अवशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. त्याचे विश्लेषण करून ‘डीएनए प्रोफाइल’ तयार केली जाते आणि पोलिसांना तसे सूचित केले जाते.२ व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी त्याचे ‘माकडहाड’ सर्वाधिक उपयोगी पडते. त्यावरून ‘डीएनए प्रोफाइल’ तयार करणे सहज शक्य होते. ते नसल्यास इतर अवशेषांतून ‘डीएनए प्रोफाइल’ तयार केली जाते.३ त्यानंतर पोलीस रक्ताच्या नात्यातील सर्वांत जवळच्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवितात. दोन्ही नमुन्यांमधील ‘जिनोटाइप’ अनेक महिने जतन करून ठेवण्याची व्यवस्था प्रयोगशाळेत असते.४ दोन्ही नमुन्यांचे पृथ:करण करून प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाठविलेल्या नमुन्यातील रक्त मृताच्या जीवशास्त्रीय आई-वडिलांचे किंवा रक्ताच्या नात्यातील इतर कुणाचे आहे का, याबाबत पोलिसांना अहवाल पाठवितात.५अनेकदा मृतदेह सडलेल्या स्थितीत असतो. हाडांची स्थितीही नमुना घेण्यायोग्य नसते. अशा वेळी ‘डीएनए प्रोफाइल’ अवघड बनते. परंतु मृताचा एक केस जरी मुळासकट सापडला, तरी ही चाचणी शक्य असते.