शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

मेजर ग्रॅहॅम यांच्या ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आॅफ द प्रिन्सिपलिटी आॅफ कोल्हापूर’ चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 16:38 IST

कोल्हापूर : इतिहास हे एक सत्य असते, त्याचे विश्लेषण वेगळे होवू शकते, मात्र वास्तव नाकारता येत नाही. इतिहासाचा आदर राखा, असे आवाहन ज्येष्ठ अर्थ व कृषितज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी सोमवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर संस्थानचे पाहिले पोलिटिकल सुपरिटेंडेंट मेजर डी. सी. ग्रॅहॅम यांनी संकलित ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आॅफ द प्रिन्सिपलिटी आॅफ कोल्हापूर’ या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देइतिहासाचा आदर राखा : यशवंतराव थोरात ‘राजर्षी शाहू साहित्य माला’ अंतर्गत सातवा ग्रंथ संपादितग्रॅहॅम याच्या अहवालात ‘अंबाबाई’ असा उल्लेख विद्यापीठातर्फे ग्रंथ आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध होणार

कोल्हापूर : इतिहास हे एक सत्य असते, त्याचे विश्लेषण वेगळे होवू शकते, मात्र वास्तव नाकारता येत नाही. इतिहासाचा आदर राखा, असे आवाहन ज्येष्ठ अर्थ व कृषितज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी सोमवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर संस्थानचे पाहिले पोलिटिकल सुपरिटेंडेंट मेजर डी. सी. ग्रॅहॅम यांनी संकलित ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आॅफ द प्रिन्सिपलिटी आॅफ कोल्हापूर’ या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर शाहू छत्रपती प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राचे संचालक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘राजर्षी शाहू साहित्य माला’ अंतर्गत हा सातवा ग्रंथ संपादित केला आहे.थोरात म्हणाले, कोल्हापूरच्या इतिहास मांडणारा मेजर ग्रॅहॅम यांचा अहवाल अदभुत आहे. त्यांनी केलेल्या कोल्हापूरच्या सखोल अभ्यासाचे यातून दर्शन घडते.शाहू छत्रपती म्हणाले, हा ग्रंथ कोल्हापूरच्या सर्व क्षेत्रातील इतिहासाचा आधारस्तंभ, पाया आहे. यात मेजर ग्रॅहॅम यांनी शेती, त्यातील उत्पादने आदींबाबत मांडलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने सध्या कार्यवाही केल्यास शेतकºयांचे विविध प्रश्न मार्गी लागतील. हा ग्रंथ संशोधकांसाठी उपयुक्त ठरणारा आहे.प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या ग्रंथाने कोल्हापूरच्या इतिहासाबाबत संशोधन करणाºयांना मोठे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. विद्यापीठातर्फे हा ग्रंथ आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन दिला जाईल.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी प्रास्ताविकात ग्रंथाचा आढावा घेतला. ते म्हणाले, १८४६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सूचनेनुसार मेजर ग्रॅहॅम यांनी कोल्हापूरबाबतच्या माहितीचे संकलन सुरू केले. याबाबत त्यांनी सात वर्षे काम करुन ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आॅफ द प्रिन्सिपलिटी आॅफ कोल्हापूर’ अहवाल  तयार केला.

१८५४ मध्ये त्याचे प्रकाशन झाले. दीडशे वर्षे हा ग्रंथ अप्राप्त होता. मूळ ग्रंथ मिळवून शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्याचे पुर्नप्रकाशन केले आहे. कोल्हापूरच्या आधुनिक इतिहासाची सुरुवात मेजर ग्रॅहॅम यांच्या या ग्रंथापासून होते. १९ व्या शतकातील लोकजीवनाचे प्रतिबिंब यातून उमटते.या कार्यक्रमास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, ‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, वसुधा पवार, लीला पाटील, माजी प्राचार्य य. ना. कदम, सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, अरुण भोसले, अवनिश पाटील, टी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.ग्रॅहॅम याच्या अहवालात ‘अंबाबाई’ असा उल्लेखअंबाबाई की, महालक्ष्मी यावरुन गेल्या दोन वर्षांत कोल्हापूरचे समाजकारण गढूळ झाले आहे. दीडशे वर्षांपूर्वी मेजर ग्रॅहॅम याने त्याच्या अहवालात तीन ते चारवेळा अंबाबाई असा, तर काही ठिकाणी महालक्ष्मी उर्फ अंबाबाई असा उल्लेख केला आहे. त्यामुळे साहजिकच यापूर्वी देखील अंबाबाई हे नाव रुढ असण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक पवार यांनी यावेळी सांगितले.

पुर्नमुद्रीत करण्याची विनंती

मराठा इतिहास हा भारतीय इतिहासाचा भाग आहे. या इतिहासाबाबत अमराठी विद्यार्थी, संशोधकांच्या अभ्यास करतात. या मराठा इतिहासाच्या अनुषंगाने संशोधन करुन शिवाजी विद्यापीठाने काही ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मात्र, यातील इंग्रजी भाषेतील ग्रंथ मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांची अडचण होत आहे. ते लक्षात घेवून विद्यापीठाने संबंधित ग्रंथांचे पुर्नमुद्रण करावे अशी विनंती करतो, असे डॉ. थोरात यांनी यावेळी सांगितले.