कोल्हापूर : शाहू टोलनाक्याजवळील गावठी बॉम्बस्फोटप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी काल, सोमवारी रात्री मुख्य संशयित आरोपी अविनाश बाबूराव बन (वय ३३, रा. तुळजाभवानी नगर, शाहू जकात नाका), त्याची मैत्रीण ज्योती ऊर्फ प्रीती राजेंद्र पवार (१९, रा. भीमनगर पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांना शिताफीने अटक केली. त्यांचा तिसरा साथीदार संशयित अभय नितीन परीख (रा. शाहूपुरी) हा फरार आहे. याप्रकरणी आणखी चौघा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे की नाही याची चाचपणी पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आज, मंगळवार पत्रकार परिषदेत दिली. संशयित अविनाश बन याने मित्र श्रीधर खुटाळे याच्याकडून व्याजाने अडीच लाख रुपये घेतले होते. त्यातील ९० हजार रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम देता न आल्याने तो वारंवार ब्लॅकमेलसाठी मैत्रिणीचा वापरज्योती पवार हिचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिला आई-वडील नाहीत. शाहूपुरीमध्ये राहणारा अभय परीख याची ती मैत्रीण आहे. श्रीधरला ब्लॅकमेल करण्यासाठी तिचा वापर करण्याचे अविनाशने ठरविले. त्यानुसार अभयच्या मदतीने तिला भीमनगर पेठ येथून कोल्हापूरला बोलावून घेतले.बॉम्ब बनविला कोणी ? बॉम्ब कसा बनविला, असा प्रश्न पत्रकारांनी अविनाशला केला. त्यावेळी त्याने भूसुरूंग कसे बनवितात, त्याची मला माहिती होती. त्यानुसार तो बनविल्याचे सांगितले. बॉम्ब बनविण्यासाठी जे साहित्य वापरले, त्याची नावे विचारली असता माहीत नसल्याचे त्याने सांगितले. एकंदरीत त्याच्या हालचालीवरून बॉम्ब बनविणारा दुसराच कोणी आहे, याची शंका पोलिसांनाही आहे.
मुख्य सूत्रधाराच्या मैत्रिणीलाही अटक
By admin | Updated: September 3, 2014 00:39 IST