याबाबत फिर्याद वसंतराव बळवंत गाताडे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोलकरणीवर (पूर्ण नाव माहीत नाही) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवार ते बुधवारदरम्यान घडला होता.
लाटवडे रोडनजीक भूमिनंदन रेसिडेन्सी येथे गाताडे एकटे राहतात. दरम्यान तोंडओळखीतून महिला मोलकरीणचे काम करण्यासाठी आली होती. दरम्यान मंगळवारी दि. १५ ते बुधवारी दि. १६ सकाळी साडेआठच्या सुमारास घरातून दोन तोळ्याची साखळी, दीड तोळे अंगठी, गणपतीचा ३० ग्रॅम चांदीचा मुकुट, ३६ हजार, मोबाईल असा एक लाख ७९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मोलकरणीने चोरून नेला. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक नासीर खान, पोलीस नाईक शोभा कुंभार करीत आहेत.