शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

सर्वच पोलीस ठाण्यांत महिलाराज

By admin | Updated: March 9, 2016 00:49 IST

महिला दिन : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांभाळला कारभार

कोल्हापूर : महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक महिला कॉन्स्टेबल सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कॉन्स्टेबल यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सर्वच पोलीस ठाण्यांत महिलाराज दिसून आले. जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी असून, प्रत्येक पोलीस ठाण्याचा कार्यभार ठाणे अंमलदार (पुरुष) सांभाळत असतात. पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक हा फक्त पोलीस ठाण्यावर नियंत्रण ठेवत असतो. तक्रार किंवा गुन्हा स्टेशन डायरीत दाखल करण्याचे काम ठाणे अंमलदार करत असतात. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, ठकबाजी, फसवणूक, बलात्कार, गर्दी, मारामारी, बनावट नाणी, अपहरण, आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंग, जुगार, मटका, आदी वेगवेगळे गुन्हे नेहमी प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. हे दाखल करण्याचे काम ठाणे अंमलदार करत असतात. पुरुष व महिला पोलिसांमध्ये समन्वय राहावा, कामाची जबाबदारी समजावी, तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षमपणे चालावे यासाठी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यांच्या कारभाराची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपविण्यात आली. ठाणेप्रमुख, ठाणे अंमलदार, मदतनीस, संगणक, वायरलेस विभाग, बिटमार्शल आदी विभागांची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपविण्यात आली होती. पोलीस ठाण्यात फोन केल्यानंतर ‘जयहिंद...’ असा महिलांचा आत्मविश्वासपूर्ण आवाज सर्वच पोलीस ठाण्यात दिवसभर घुमत होता. मंगळवारी शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी व करवीर पोलीस ठाण्यात अनेक महिलांनी भेट देऊन आपली गाऱ्हाणी सांगून महिला पोलिसांकडून सल्ला घेतला. (प्रतिनिधी)यांनी सांभाळला कारभार लक्ष्मीपुरी : मनीषा गबाले (पोलीस उपनिरीक्षक), ठाणे अंमलदार - पूनम ढाले, सायली कुलकर्णी, अस्मिता लोहार, छाया पाटोळे, अमृत मोरे. जुना राजवाडा : स्मिता काळभोर (सहायक पोलीस निरीक्षक), शकुंतला मोहळकर (ठाणे अंमलदार), मैनाताई खाडे, पिंकीता अतिग्रे, रूपाली रानगे, जन्नत नगारजी, दीपाली सरकुले, शिल्पा आडके, सोनाली बागुल.शाहूपुरी : तृप्ती देशमुख (सहायक पोलीस निरीक्षक), राधिका मुंडे (ठाणे अंमलदार), सरस्वती माने, प्रतिभा कांबळे, संगीता खोत, दीपाली इंगवले, स्वप्नाली खोत. राजारामपुरी : शोभा पोवार (ठाणे अंमलदार), वनिता वडर, सुलोचना पाटील, नीलम खोत, सुप्रिया आपटे, अर्चना जाधव, शमिता मुल्ला, रश्मी जहागीरदार, साधना माने, भाग्यश्री भोई, स्वाती जुगर. करवीर : पुष्पलता मंडले (सहायक पोलीस निरीक्षक), एल. व्ही. जाधव (ठाणे अंमलदार), वैजयंती हावळ, दीपाली कदम, वंदना कुंभार, राजश्री पसारे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदनमहिला दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा कार्यभार महिला अधिकाऱ्यांकडे सोपविल्याबद्दल वूमेन्स फौंडेशनच्यावतीने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी फौंडेशनच्या संपदा कुलकर्णी, संगीता जोशी, राज्ञी यादव, संध्या कुलकर्णी, मयूरा फडणीस, अनुपमा मुळे, राजश्री यादव यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यास भेट देऊन महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ दिले.