शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शंभो.. शंकरा'च्या गजरात कोल्हापुरात महाशिवरात्री साजरी

By संदीप आडनाईक | Updated: March 8, 2024 16:17 IST

अंबाबाई मंदिरातील मातृलिंग भाविकांच्या दर्शनाखाली खुले 

कोल्हापूर : शिवशंकराची स्तुतीस्तोत्र, ओम नम:शिवायचा जप, रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक बेल, फूल, धूप, आरती, पालखी सोहळा, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद अशा मंगलमय आणि धार्मिक उपक्रमांनी शुक्रवारी जिल्ह्यात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली.महाशिवरात्रीमुळे फुलांच्या बाजारात बेल आणि पांढऱ्या फुलांना चांगलीच मागणी होती. कित्येक मंदिरांमध्ये महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शंभो.. शंकरा..च्या गजरात शहरासह जिल्ह्यात महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला. या सर्वच मंदिरांत गुरुवारी रात्री विद्युत रोषणाई केली होती.अंबाबाई मंदिर परिसरातील अतिबलेश्वर, काशी विश्वेश्वर, कपिलतीर्थ आदींसह उत्तरेश्वर, ऋणमुक्तेश्वर, रावणेश्वर, चंद्रेश्वर, वटेश्वर, कैलासगडची स्वारी, लक्षतीर्थ, कोटीतीर्थ सोमेश्वर, बाळेश्वर, निवृत्ती चौकातील ब्रम्हेश्वर आदी शिवमंदिरांची सजावट करुन केळीचे खांब, फुलांच्या माळा व विद्युत रोषणाईने मंदिरे उजळून गेली होती. मंगळवार पेठेतील ‘कैलासगडची स्वारी’ मंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला, तसेच एस. टी. स्टँड चौकातील वटेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

वर्षातून एकदाच होते मातृलिंगाचे दर्शनअंबाबाई मंदिरातील मातृलिंग भाविकांच्या दर्शनाखाली खुले केले होते. वर्षातून काही महत्त्वाच्या दिवशीच उघडण्यात येणाऱ्या या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

चंद्रेश्वर महादेव मंदिरात पौराणिक देखावाशिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीतील श्री चंद्रमहाल तरुण मंडळाने चंद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकर आणि प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामेश्वरम मंदिराचा पौराणिक देखावा उभारला आहे. अजय काटाळे, रोशन जोशी, सत्यजित मोहिते यांनी ही पूजा बांधली आहे.

ऋणमुक्तेश्वर मंदिरात पालखी सोहळा

शुक्रवार पेठ गंगावेस परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिर व तालीम मंडळामार्फत यंदाही महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिरात राम आणि सीता महादेवाची पूजा बांधली आहे. शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता श्री मूर्तीची ॲड.अद्वैत गुलाबराव घोरपडे (सरकार) यांच्या हस्ते महाअभिषेक आणि महापूजा झाली. सायंकाळी ६:३० वाजता पारंपरिक करवीर गर्जना ढोलताशा पथक, महिलांचे लेझीम पथक, भजनी मंडळ व भक्तांच्या उपस्थितीत भव्य पालखी निघाली. या सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, कृष्णराज महाडिक, दौलत देसाई उपस्थित होते.

उत्तरेश्वरात यात्रा

कोल्हापुरातील सर्वांत मोठे शिवलिंग असलेल्या उत्तरेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. या महादेव मंदिर आवारात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. यंदाही पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि भाविकांच्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रावणेश्वर मंदिरात गर्दी

रावणेश्वर मंदिरात सकाळी सात वाजल्यापासूनच भाविकांच्या गर्दीत लघुरुद्राभिषेक झाला. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून अभंगवाणी, भक्तिगीतांचा कार्यक्रम, महिला भजनी मंडळाचा अभंगवाणी, भावगीते तसेच भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. सायंकाळी झालेल्या यामपूजेला शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक, रुद्राभिषेक आणि भस्मारती, मध्यरात्री शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक व बिल्वार्चन पूजा झाली तसेच जागरण करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर