शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

फुटबॉल ची ‘महा’ शाळा, कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलचा राज्यातही दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 16:06 IST

पश्चिम महाराष्ट्रात फुटबॉल म्हटले की, कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरी शाहू स्टेडीयम व स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणारी खाण म्हणून शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलचे नाव सर्वत्र घेतले जाते.

ठळक मुद्देफुटबॉल ची ‘महा’ शाळा, कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलचा राज्यातही दबदबा फुटबॉल पंढरी पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंची खाण

सचिन भोसलेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात फुटबॉल म्हटले की, कोल्हापूरच्याफुटबॉल पंढरी शाहू स्टेडीयम व स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणारी खाण म्हणून शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलचे नाव सर्वत्र घेतले जाते. या शाळेत शिक्षणाबरोबर फुटबॉलसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे राज्यात या शाळेने राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेत अनेक वेळा राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. अशा या फुटबॉलच्या ’महा’शाळेविषयी थोडसं..संस्थान काळात राजर्षी शाहू महाराजांनी विविध जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांकरीता अनेक वसतीगृहांची स्थापना केली. त्यापैकी एक असलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग मध्ये १ मे १९६० रोजी महाराष्ट्र हायस्कूलची स्थापना संस्थेने केली.

या शाळेच्या स्थापनेपासून रांगडया खेळासाठी ही शाळा अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. त्यात पेठापेठांतील फुटबॉलचा वाढता प्रसार पाहून शाळेच्या व्यवस्थापनाने फुटबॉल खेळाला अधिक प्राधन्य दिले. त्यात १९७० पासून शाळेने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शालेय फुटबॉल स्पर्धांमध्ये एकही विजेतेपद सोडले नाही.

असा हा दबदबा आजही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कायम ठेवला आहे. त्यात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूही राज्याला व देशाला दिले आहेत. विशेष म्हणजे १९७० पासून १४ , १७ आणि १९ वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंना घडविणारी खाण म्हणून ही शाळा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

पहाटे पाच वाजता शाळेचे क्रीडा शिक्षक शाळेच्या मैदानावर हजर असतात. त्यानंतर साडेपाच पर्यंत त्या त्या गटातील खेळाडूही मैदानावर हजर होता. या शिस्तीचा खाका आजही पाळला जात आहे. फुटबॉलपटू आपला पाल्य तयार व्हावा. जिल्हाभरातील अनेक पालक आपल्या पाल्यांना खास महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश मिळावा. याकरीता विशेष प्रयत्न करीत असतात.

स्थानिक पातळीवरील के.एस.ए.लिग स्पर्धेत खेळणाऱ्या सोळा संघातही याच शाळेतील जवळ जवळ ८० टक्के खेळाडूंचा सहभाग असतो. त्यामुळे खेळाडू दहावी झाला की स्थानिक फुटबॉल संघ, क्लब मधून खेळतो. विशेष म्हणजे येथील फुटबॉलपटू पुढे शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करतो, अशी ख्याती या शाळेचे आहे.सद्यस्थितीत शाळेच्या फुटबॉल संघांना प्रदीप साळोखे हे प्रशिक्षण देतात. विशेष म्हणजे साळोखे हेही उत्कृष्ट फुटबॉलपटू व राष्ट्रीय फुटबॉलपंच आहेत. यंदाही या शाळेच्या १४ व १७ वर्षाखालील फुटबॉल संघाची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्र हायस्कूलच्या शालेय फुटबॉल संघाची आतापर्यंतची कामगिरी 

  1. १७ वर्षाखालील सुब्रतो मुखर्जी चषक (राज्यस्तर) २२ वेळा निवड
  2. १४ वर्षाखालील सुब्रतो मुखर्जी चषक (राज्यस्तर) १३ वेळा निवड
  3. १७ वर्षाखालील सुब्रतो मुखर्जी चषक (राष्ट्रीयस्तर, दिल्ली ) ९ वेळा पात्र
  4. १४ वर्षाखालील सुब्रतो मुखर्जी चषक (राष्ट्रीयस्तर ,दिल्ली ) ४ वेळा पात्र
  5. १७ वर्षाखालील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी ९वेळा पात्र
  6. १४ वर्षाखालील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी ११ वेळा पात्र
  7. १९ वर्षाखालील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी ४४ वेळा पात्र

 

खेळाडूंची खाणया शाळेतून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केले आहेत. यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अजिंक्य गुजर (चीन येथे झालेल्या शालेय स्पर्धेसाठी निवड), पोलीस निरीक्षक रविद्र साळोखे, प्रा. अभिजीत वणिरे, संभाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे भाऊ सरनाईक, विश्वास कांबळे, बाबु घाटगे, नॅशनल डेअरीचे माजी अध्यक्ष अरुण नरके, प्रा. अमर सासने, शरद माळी, असे एक ना अनेक हजारो खेळाडू या शाळेने घडविले आहेत.यासह शिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टिस क्लब, पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, पॅट्रीयट स्पोर्टस, शिवनेरी, खंडोबा तालीम मंडळ, फुलेवाडी क्रीडा मंडळ, उत्तरेश्वर प्रासादीक तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ तालीम मंडळ, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, साईनाथ स्पोर्टस, कोल्हापूर पोलीस दल अशा सोळा संघातून याच शाळेचे ८० टक्याहून अधिक फुटबॉलपटू दरवर्षी खेळतात.

माजी विद्यार्थ्याकडून फुटबॉलवर ‘पीएच.डी’कोल्हापूरच्या फुटबॉलला संशोधनातून नवी दिशा मिळावी म्हणून महाराष्ट्र हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रा. अभिजीत वणिरे यांनी ‘कोल्हापूर विभागातील राष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंची अभिवृत्ती ’ याविषयावर पीएच.डी. केली. त्याचा उपयोग अनेक खेळाडूंना झाला. त्यातून फुटबॉलपटूंची खाण असणाऱ्या या जिल्ह्याला खेळाडूंची मानसिकता काय आहे. हे पाहता आले. त्यातून खेळाडूंचा अर्थिक विकास होणे गरजेचे आहे, याची जाणीव झाली.

गेली दहा वर्षे माझ्या शाळेचे अनेक खेळाडू स्थानिक फुटबॉल संघांसह देशभरातील विविध नामवंत संघातून खेळत आहेत. सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत खेळाडू अकरा वर्षाचा असल्यापासून त्याचे फुटबॉल कौशल्य पाहीले जाते. त्यातून १४, १७ वयोगटात खेळण्यासाठी तयार केले जाते. बाराही महीने हे प्रशिक्षण शाळेच्या मैदानावर सुरु असते. यात दिवाळी, मे महिन्याची सुट्टीही दिली जात नाही. उन पावसाची तमा न बाळगता खेळाडू सराव करतात. त्यामुळे माझ्या संघाला जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेकदा यश मिळाले आहे. यापुर्वी अप्पासाहेब वणिरे, आर.डी.पाटील, उदय आतकिरे, अभिजीत वणिरे या फुटबॉल मार्गदर्शकांनी शाळेच्या संघासाठी कष्ट घेतले आहे. संस्थाही कायम फुटबॉलच्या पाठीशी राहीली आहे.- प्रदीप साळोखे,क्रीडा शिक्षक, महाराष्ट्र हायस्कूल

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर