शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जनऔषधी दुकानांमध्ये महाराष्ट्र भारतात पाचव्या क्रमांकावर

By समीर देशपांडे | Updated: March 7, 2023 11:29 IST

भारतातील अनेक कंपन्या हजारो कोटींमध्ये जेनेरिक औषधे विदेशामध्ये पाठवितात

समीर देशपांडेकोल्हापूर : सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण औषधे कमी किमतीत देणारी जनऔषधी दुकाने सुरू करण्यात महाराष्ट्र भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. उद्या, ७ मार्च रोजी जनऔषधी दिन साजरा होणार असून, यानिमित्ताने केंद्र शासनाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या जनऔषधी दिनानिमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, येत्या ८ वर्षांत या औषधांच्या माध्यमातून २० हजार कोटींची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांना औषधे रास्त दरात मिळावीत, यासाठी ही जेनेरिक मेडिसिन अर्थात ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना’ सुरू केली. भारतातील अनेक कंपन्या हजारो कोटींमध्ये जेनेरिक औषधे विदेशामध्ये पाठवितात. परंतु, भारतात मात्र हीच औषधे ब्रॅन्डेड कंपन्यांच्याच नावावर विक्रीस येतात. या औषधांसाठी झालेला संशोधन खर्च वसूल झाल्यानंतर ही औषधे कमी किमतीत देण्यात येतात. परंतु, अजूनही भारतामध्ये सरसकट जेनेरिक औषधे घेतली जात नाहीत. सर्वसाधारणपणे अशा औषधांच्या किमतीमध्ये किमान दुप्पट फरक दिसून येतो. त्यामुळे नागरिकांचा कल याकडे वाढत असून, केंद्र शासनाने दिलेली आकडेवारीच हे स्पष्ट करत आहे. देशभरात ३१ जानेवारी २०२३ अखेर ९,०८२ जनऔषधी दुकाने असून, यातील १ हजार शासकीय जागेत आहेत.यंदा १ ते ७ मार्च दरम्यान जनऔषधी सप्ताह साजरा केला जात असून, ७ मार्च रोजी विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये चेतना अभियान, प्रतिज्ञा यात्रा, एक कदम मातृशक्ती की ओर, आरोग्य शिबिरे आदी उपक्रमांचा समावेश आहे.

भारतातील जनऔषधी दुकानेसन  -  दुकाने - विक्री  - विकली जाणारी औषधे२०१५ - ८० -  ७ कोटी - ४००२०२३ - ९०८२ - ९९१ कोटी - २०३९

देशातील सर्वाधिक जनऔषधी दुकाने असलेली राज्ये

  • उत्तर प्रदेश - १२९३
  • कर्नाटक - १०३४
  • केरळ - ९७७
  • तामिळनाडू - ८५९
  • महाराष्ट्र - ६३६

जेनेरिक औषधे ही संकल्पना अजूनही तालुका पातळीवरच सीमित असल्याचे जाणवते. त्याचा लाभ सर्वसामान्य ग्रामीण जनतेला व्हावा, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ठराविक दिवशी अधिकृत विक्रेत्यामार्फत ही औषध विक्री करावी, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. - संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmedicineऔषधंMedicalवैद्यकीय