शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा ‘अ‍ॅप’वर : विजयसिंह यादव महाविद्यालयातील महेश निलजे यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:06 IST

सुहास जाधव ।पेठवडगाव : मोबाईलवरील विविध अ‍ॅपमुळे वेळेची बचत व्हावी, असा प्रयत्न अ‍ॅप निर्मात्यांचा असतो. अशा प्रयत्नांतून शैक्षणिक अ‍ॅप पेठवडगाव येथील महेश बाबूराव निलजे यांनी तयार केले आहे. यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा एका टचवर (एमपीयूए) आला आहे. याची खुद्द दखल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे.कोल्हापूरच्या शिवाजी ...

ठळक मुद्दे विद्यार्थी, शिक्षकांना उपयुक्त काही तरी केले पाहिजे यातून सहा-सात महिन्यांपासून अ‍ॅप करण्याचे काम सुरू केले. त्यास यश

सुहास जाधव ।पेठवडगाव : मोबाईलवरील विविध अ‍ॅपमुळे वेळेची बचत व्हावी, असा प्रयत्न अ‍ॅप निर्मात्यांचा असतो. अशा प्रयत्नांतून शैक्षणिक अ‍ॅप पेठवडगाव येथील महेश बाबूराव निलजे यांनी तयार केले आहे. यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा एका टचवर (एमपीयूए) आला आहे. याची खुद्द दखल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या विजयसिंह यादव महाविद्यालयात निलजे १९९९ पासून अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष आहेत. विद्यापीठ कायद्याचे माहिती शोधण्यासाठी पुस्तक चाळावे लागत होते. त्यामुळे वेळ जात होता किंवा एखाद्या जाणकारास त्याबाबतची माहिती विचारावी लागत असे. महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, आदींना विद्यापीठ कायद्याची माहिती तत्काळ मिळत नव्हती. नेहमी सोबत पुस्तक ठेवणे आवश्यक असत होते. मात्र, आज जेथे तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट हा पर्याय आहे. त्यामुळे काही तरी केले पाहिजे यातून सहा-सात महिन्यांपासून अ‍ॅप करण्याचे काम सुरू केले. त्यास यश आले. कायदा, पोटकलम, आदी माहिती ही अ‍ॅपमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर अ‍ॅपचे उद्घाटन मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ खरात, संचालक डॉ. धनराज माने, आनंद म्हापूसकर, राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभुवन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.मुंबई येथे पेठवडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयाचे अधीक्षक महेश बाबूराव निलजे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २0१६ या अ‍ॅपचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश निलजे, सिद्धार्थ खरात, डॉ. धनराज माने, आनंद म्हापूसकर, रावसाहेब त्रिभुवन, आदी उपस्थित होते.अ‍ॅपचा फायदाअ‍ॅप हे आॅफलाइनने पाहू शकतो. अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, आदींना विद्यापीठ कायद्याची व संदर्भ कलमासह माहिती मिळणार, इंग्रजी व मराठी अशी दोन भाषेत आहे. 

हे अ‍ॅप तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, सचिव विद्या पोळ, सहसंचालक कार्यालय, यादव महाविद्यालय, आदींचे प्रोत्साहन लाभले.- महेश निलजे,अ‍ॅप निर्माता / अधीक्षक