शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बालाच्या ‘महाराष्ट्र केसरी’मुळे आंदळकर वस्तादांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:10 IST

कोल्हापूर : जालना येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविलेला बाला रफीक शेख मूळचा सोलापूर जिल्ह्यातील ...

कोल्हापूर : जालना येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविलेला बाला रफीक शेख मूळचा सोलापूर जिल्ह्यातील खडकी गावचा रहिवासी असला तरी कुस्तीचे धडे त्याने गेल्या वर्षापर्यंत कोल्हापुरातील न्यू मोतीबाग तालीम येथे दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले आहेत. त्यामुळे या तालमीतील मल्लांनी बाला रफीक शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पटकावताच रविवारी सायंकाळी एकच जल्लोष केला. किताबाच्या रूपाने ‘बाला’ने आंदळकर वस्तादांना आदरांजली वाहिल्याची भावना मल्लांनी व्यक्त केली.न्यू मोतीबाग तालीम येथे बाला रफीक वयाच्या चौदाव्या वर्षापासून सराव करीत होता. त्याने या तालमीत दिवंगत आंदळकर वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्ती स्पर्धा गाजविल्या. त्या लढतींतील त्याची चुणूक एक दिवस त्याला ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेपर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास त्याच्यासोबत सराव करणाऱ्या मल्लांनाही होता. विशेष म्हणजे आंदळकर वस्तादांनी त्याचा कल पाहून त्याला दुहेरी पट, हफ्ता, ढाक आणि दशरंगी डावांमध्ये पारंगत केले होते. त्याने उपांत्य फेरीतही माती गटात रत्नागिरीच्या संतोष दोरवडला याच ‘दशरंगी’ डावावर लोळवत विजय मिळविला. त्याने मॅट गटात पारंगत असलेल्या पुण्याच्या अभिजित कटकेवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत एकेरी पट काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने विजय मिळविताच न्यू मोतीबाग तालमीतील त्याच्या सहकाºयांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे यापूर्वी २००८, २००९ ला सलग दोन वर्षे याच तालमीचा पठ्ठा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलने हा किताब पटकाविला. त्यानंतर २०१० ला मल्ल नंदू आबदार याने ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविला. त्यानंतर पुन्हा एकदा या न्यू मोतीबाग तालमीमध्ये महाराष्ट्र केसरीची गदा आणली गेली. त्यामुळे रविवारी येथील मल्लांनी एकच जल्लोष केला. यावेळी अनेकांनी त्याने मिळविलेले यश हे खºया अर्थाने दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना आदरांजली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे याच तालमीतील उपमहाराष्ट्र केसरी बाळू पाटील, संजय पाटील, नंदू आबदार, मारुती जाधव आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, अभिजित आंदळकर यांनी त्याला विशेष सहकार्य केले आहे.यावेळी बाजीराव चौगुले, अनिल चव्हाण, सागर लाड, अक्षय पाटील, शंकर चौगुले, मारुती सूळ, सुनील जाधव, अजित पाटील, अविनाश पाटील, भरत लोकरे, सिद्धाप्पा होमणे, दत्ता होमणे, विकास पाटील, आदी मल्ल उपस्थित होते.