कोल्हापूर : शालेयस्तर १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने सेंट झेविअर्सवर मात करीत सहाव्यांदा चषक पटकाविला.आज, सोमवारी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने सेंट झेविअर्सचा ४-० असा पराभव केला. सामन्यात प्रणव कागले याने दोन, तर तेजस अपराध व अनिकेत वरेकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. १९ वर्षांखालील मुलांमध्ये महावीर कॉलेजने राजाराम महाविद्यालयाचा २-१ असा टायब्रेकरवर, तर स. म. लोहिया हायस्कूलने शाहू महाविद्यालयाचा १-० असा पराभव केला. अन्य सामन्यात उदयसिंह गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाने कॉमर्स कॉलेजचा १-० असा पराभव करीत पुढील फेरी गाठली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट यांच्या हस्ते झाला. यावेळी नेताजी डोंगरे, किरण साळोखे, क्रीडाधिकारी उदय पोवार, सचिन पांडव, प्रदीप साळोखे, राजेंद्र घारगे, आदी उपस्थित होते. पोलीस कवायत मैदान येथे १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत विजयी महाराष्ट्र हायस्कूलच्या संघास विजेतेपदाचा चषक देताना पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट. सोबत नेताजी डोंगरे, किरण साळोखे, क्रीडाधिकारी उदय पोवार, सचिन पांडव, प्रदीप साळोखे, राजेंद्र घारगे, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र हायस्कूल सहाव्यांदा विजयी
By admin | Updated: August 12, 2014 00:39 IST