शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल अध्यक्ष निवड १४ आॅगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 16:18 IST

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदाची निवडणूक १४ आॅगस्टला मुंबईत होत आहे. गेली १९ वर्षे वंचित असलेल्या कोल्हापूरला हे पद मिळावे यासाठी अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ठोस अशा कोणाच्याच नावाची चर्चा अद्याप नाही. गोपनीय स्तरावर अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. चर्चेतून नाशिकचे जयवंत जयभावे, ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर (पुणे), वसंत साळोखे (औरंगाबाद), अनिल गोवरदिपे (नागपूर), विठ्ठल देशमुख (मुंबई) यांची नावे पुढे येत आहेत. निवडीच्या पूर्वसंध्येला अंतिम नाव जाहीर होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल अध्यक्ष निवड १४ आॅगस्टलामुंबईत होणार बैठक : विवेक घाटगेंसह सहाजण स्पर्धेत

कोल्हापूर : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदाची निवडणूक १४ आॅगस्टला मुंबईत होत आहे. गेली १९ वर्षे वंचित असलेल्या कोल्हापूरला हे पद मिळावे यासाठी अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ठोस अशा कोणाच्याच नावाची चर्चा अद्याप नाही. गोपनीय स्तरावर अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. चर्चेतून नाशिकचे जयवंत जयभावे, ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर (पुणे), वसंत साळोखे (औरंगाबाद), अनिल गोवरदिपे (नागपूर), विठ्ठल देशमुख (मुंबई) यांची नावे पुढे येत आहेत. निवडीच्या पूर्वसंध्येला अंतिम नाव जाहीर होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कौन्सिलचे एकूण २५ सदस्य आहेत. त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांची निवड केली जाते. कमिटीचा पाच वर्षांचा कार्यकाल आहे. कोल्हापूरचे अ‍ॅड. विवेक घाटगे यांना कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग व सोलापूर या चार जिल्ह्यांतील सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यांची अध्यक्षपदासाठी निवड झाल्यास सर्किट बेंचच्या आंदोलनाची ताकद वाढणार आहे.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक रिंगणात २५ जागांसाठी राज्यातून १६४ उमेदवार उभे होते. त्यासाठी ५९ हजार सदस्यांनी मतदान केले. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतून १७ उमेदवारांनी निवडणूक लढविली. या उमेदवारांना राज्यभरातून वकीलांनी मतदान केले. ५ मे २०१८ पासून जिल्हानिहाय मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीला १० महिन्यांचा कालावधी लागला. कोल्हापुरातून अ‍ॅड. विवेक घाटगे, सिंधुदुर्गमधून अ‍ॅड. संग्राम देसाई, साताऱ्यातून अ‍ॅड. वसंतराव भोसले, सोलापुरातून अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांची निवड झाली.

मोर्चेबांधणी सुरुकोल्हापुरातून सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे यांनी तीन महिन्यांसाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर अ‍ॅड. ए. डी. शेळके, अ‍ॅड. बी. डी. शेळके, अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांची सदस्यपदी वर्णी लागली होती. त्यानंतर १९ वर्षांनी कोल्हापूरला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे मला संधी द्यावी, अशी इच्छा अ‍ॅड. घाटगे यांनी कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. नाशिकचे जयभावे हे प्रत्येक सदस्याच्या संपर्कात आहेत. त्यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. पुण्याचे निंबाळकर हे दोन वेळा अध्यक्ष होते. औरंगाबादचे साळोखे, नागपूरचे गोवरदिपे, मुंबईचे देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आहे.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारीअ‍ॅड. आशिष देशमुख (पुसद- यवतमाळ), गजानन चव्हाण (ठाणे), विठ्ठल देशमुख (मुंबई), परिजात पांडे (नागपूर), राजेंद्र उमाप (पुणे), जयवंत जयभावे (नाशिक), हर्षद निंबाळकर(पुणे), अविनाश आव्हाड (पुणे), संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), वसंत साळुंखे (औरंगाबाद), विवेकानंद घाटगे (कोल्हापूर), मोतीसिंग मोहता (अकोला), आनंदराव पाटील (लातूर), असिफ कुरेशी (नागपूर), उदय वारूंजकर(मुंबई), मिलिंद पाटील (उस्मानाबाद), मिलिंद थोबडे (सोलापूर), अनिल गोवरदिपे (नागपूर), सतीश देशमुख (हिंगोली), अमोल सावंत (औरंगाबाद), अविनाश भिडे (नाशिक), सुभाष घाटगे (मुंबई), सुदीप पासबोला (ठाणे), वसंतराव भोसले (सातारा), अहमदखान पठाण (पुणे).

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू आहेत.अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. प्रत्येकाशी संपर्कात असून संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे.- अ‍ॅड. विवेक घाटगे , "कोल्हापूर

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर