शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Radhanagari Vidhan Sabha Election 2024: राधानगरीत हॅट्ट्रिक साधत प्रकाश आबिटकर ठरले 'भारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:58 IST

शिवाजी सावंत गारगोटी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ...

शिवाजी सावंतगारगोटी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेचे उमेदवार माजी आमदार के.पी. पाटील यांचा ३८ हजार २५९ मतांनी दारूण पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. आमदार आबिटकर यांना १ लाख ४४ हजार ३५९ इतकी मते मिळाली तर माजी आमदार के.पी. पाटील यांना १ लाख ६ हजार १०९ इतकी मते मिळाली. आमदार आबिटकर यांना तिसऱ्यांदा विजयी करून मतदारांनी मतपेटीतून पुन्हा ‘प्रकाश’राज आणले. सलग तिसऱ्यांदा माजी आमदार के.पी. पाटील यांना मतदारांनी नाकारले.येथील मौनी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून आमदार आबिटकर यांचा मताधिक्याचा आलेख चढता राहिला. कोणत्याही फेरीत के.पी. पाटील यांना मताधिक्य मिळाले नाही. दहाव्या फेरीअखेर मताधिक्य वाढत राहिल्याने आमदारप्रेमी उत्साही कार्यकर्त्यांनी गावागावांत फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली.

महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांची संख्या अधिक आहे. माजी आमदार के.पी. पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी भक्कम ताकद लावली होती. आमदार सतेज पाटील यांनी कडक प्रचार यंत्रणा लावली होती. त्यामुळे सुरूवातीपासूनच त्यांचे पारडे जड वाटत होते. त्यांच्या आव्हानाला आमदार आबिटकर हे महायुतीतील मित्रपक्ष आणि भाजपला सोबत घेऊन विकास कामांच्या जोरावर एकाकी झुंज देत होते.सर्व सहकारी, पक्षाच्या नेत्यांनी दिलेले कानमंत्र आणि अर्जुन आबिटकर यांनी लावलेल्या ‘जोडण्या’, मतदारांनी निरपेक्ष भावनेने दिलेले मतदान, लाडक्या बहिणींनी दिलेली ओवाळणी या चार सूत्रीमुळे आमदार आबिटकर यांनी विजयाची मोहर उमटवली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा अधिक ईर्षेने आणि चुरशीने ही निवडणूक लढली गेली.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण जनतेने नेत्यांच्या फॅक्टरपेक्षा मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करून आमदार आबिटकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. विकासकामांचा डोंगर उभा करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. गेल्या दहा वर्षांत ते चोवीस तास सर्वसामान्यांसाठी उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीसोबत थेट संपर्क, विकासाचा आश्वासक चेहरा या त्यांच्या जमेच्या बाजू राहिल्या. तर के.पी. पाटील यांचा मतदारसंघात लोकसंपर्काचा अभाव, विकासाचा कोणताही आराखडा न सांगता केवळ गद्दार आणि गाडण्याची भाषा लोकांना आवडली नाही. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात सत्तेत असतानाही कोणताही ठोस विकास केलेला नाही. त्यामुळे मतदारांनी ‘लई भारी बसा घरी !’ म्हणत पराभव केला.

  • झालेले मतदान ७८.३० टक्के
  • पुरुष- १४०३१५
  • स्त्री- १२९३६५
  • इतर- ९
  • एकूण- २,६९,६८९

पराभूत उमेदवार

  • उद्धवसेनेचे के.पी. पाटील १ लाख ६ हजार १००
  • अपक्ष- ए.वाय. पाटील १८ हजार ८९१
  • मनसे- युवराज येडूरे ६०४
  • बसपा- पांडुरंग गणपती कांबळे ५६९
  • अपक्ष- कृष्णात पाटील ११५७
  • कदरतूल्ला लतिफ १४९
  • नोटा- ९९६

२०१९ च्या निवडणुकीत आमदार आबिटकर यांना १८ हजार ४३० तर यंदा २० हजार मतांची वाढ होऊन ३८ हजार २५९ चे मताधिक्य मिळाले

 

  • आमदार आबिटकर- १,४२,१०५
  • के.पी. पाटील- १,०६,१००
  • मताधिक्य- ३८,२५९

विजयाची कारणे

  • मतदारसंघाच्या विकासाची खात्री आणि भरीव कामगिरी करणार असा जनतेला असलेला विश्वास
  • कार्यकाळात विकासकामांचा डोंगर उभा करून आरोग्य, शैक्षणिक, रस्ते, पर्यटन या क्षेत्रात नेत्रदीपक काम,
  • अतूट असा जबरदस्त लोकसंपर्क,
  • लाडक्या बहिणींनी दिलेली साथ

पराभवाची कारणे

  • मतदारसंघात दहा वर्षांत अत्यल्प जनसंपर्क
  • विकासाच्या दूरदृष्टीचा अभाव,
  • लोकांनी निवडणूक हातात घेतली.

लोकांसाठी केलेले काम, मतदारसंघाचा केलेला कायापालट यामुळे सर्व मतदार बंधू-भगिनींनी मताच्या रुपाने भरभरून प्रेम दिले. भविष्यात या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणार. रोजगार निर्मितीवर विशेष भर देणार. -आमदार प्रकाश आबिटकरजनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. यापुढेही राजकारण,सहकार आणि समाजकारणात आग्रही राहणार. -माजी आमदार के.पी. पाटील

नेते विरुद्ध सामान्य जनता अशी लढतयावेळी झालेली निवडणूक ही नेते विरुद्ध सामान्य जनता अशी झाली आहे. या लढाईत सामान्य माणूस असामान्य आणि किंगमेकर ठरला आहे.टपाली ते निकालीआमदार आबिटकर यांनी टपाली मतपासून घेतलेली मताधिक्याची आघाडी एकतीस फेऱ्यांच्या मताधिक्याने निकाली झाली.सेनेचा पराभव सेनेकडूनशिवसेना पक्षाच्या विभागणी नंतर दोन गटांत झालेल्या लढतीत शिंदेसेना विजयी झाली, तर उद्धव सेनेचा पराभव झाला. अशी लढत ही पहिल्यांदाच झाली आहे.गटातटाच्या राजकारणाला तिलांजली ..लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपल्या मतातून शिक्कामोर्तब केले. हा मतदारसंघ नेत्यांवर नाही तर कर्तृत्वावर भाळतो हे दाखवून दिले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024radhanagari-acराधानगरीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPrakash abitkarप्रकाश आबिटकरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024