शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

Maharashtra Assembly Election 2019 : रविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:34 IST

स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

ठळक मुद्देरविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’राजू शेट्टी यांनी लावला बिल्ला : चूक झाल्याची कबुली

कोल्हापूर : स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

संघटना सोडणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असल्याचे तुपकर यांनी, तर कुटुंबप्रमुख म्हणून वडीलकीच्या नात्याने माफ करून परत घेतले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेंतर्गत असलेल्या वादामुळेच राजीनामा दिला होता, आता त्यावर पडदा पडला आहे, असे दोघांनीही स्पष्ट केले.गेल्या महिनाअखेरीस राजीनामा देऊन अनपेक्षित धक्का देणाऱ्या तुपकरांनी बुधवारी स्वाभिमानीत परत येऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. कोल्हापुरात दुपारी झालेल्या पत्रकार बैठकीत राजू शेट्टी यांनी घोषणा करताना, संघटनेंतर्गत कुरबुऱ्यांमुळे रागाच्या भरात हा निर्णय घेतला होता. आता त्यांची चूक त्यांना उमगली आहे.

शेतकरी चळवळीपेक्षा कोणी मोठा नाही, याचे भान त्यांना लवकर आले. आजच्या घडीला ही चळवळ टिकविणे महत्त्वाचे आहे. तुुपकर यांच्यासारख्या बिनीच्या शिलेदाराची गरज आहे. पुन्हा एकदा ताठ मानेने काम करतील, असे सांगितले.तुपकर यांनी आपली भूमिका मांडताना अंतर्गत वाद सोडविले नसल्यानेच रागातून बाहेर पडलो होतो. सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नसतात, हे शेट्टी यांच्या मुशीत राहून शिकलो असल्याने फार काही बोलणार नाही; पण संघटना सोडण्याची चूक उमगली आहे. त्याचा पश्चाताप होत असून, संघटनेत कोणतेही पद न घेता सामान्य कार्यकर्ता म्हणूनच महाराष्ट्रभर संघटना पोहोचविण्यासाठी काम करणार आहे, असे सांगितले. यावेळी स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राज्य प्रवक्ते अनिल पवार, पंढरीनाथ मांडरे, बापूसाहेब कारंडे, रमेश भोजकर, स्वस्तिक पाटील उपस्थित होते.तुपकर परत का आलेतुपकर संघटना सोडून का गेले, याचे उत्तर त्यांनी राजीनामा देतानाही कळले नव्हते, अंतर्गत वाद असल्याचे ते आता सांगत असले तरी खरे कारण उघड झालेलेच नाही. आता संघटनेत परत आल्यानंतरही ते परत का आले याचे उत्तरही कोणी द्यायला तयार नाही. पत्रकार बैठकीत देखील त्यांना खोदून खोदून विचारले तरी त्यांनी उत्तर देणे टाळले; त्यामुळे ते गेले का आणि परत आले का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.काटेही लवकरच परत येतीलमला सांगूनच तुपकर संघटनेतून बाहेर पडले, मला विचारूनच परत आले. भगवान काटे मला न विचारता गेले आहेत; पण त्यांना स्वत: मीच परत आणणार आहे. त्यांची लवकरच समजूत काढणार आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकाची चळवळीला गरज आहे. त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अजून स्वीकारलेला नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरRavikant Tupkarरविकांत तुपकर