शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक

By admin | Updated: May 15, 2017 01:01 IST

५६ वा वार्षिक सोहळा : विविध रंगातील मूर्तीच्या छटा पाहून श्रावक-श्राविका सुखावल्या

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठातील श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर रविवारी धार्मिक सोहळ्यात महामस्तकाभिषेक करण्यात आला. ५६ व्या वार्षिक महामस्तकाभिषेकासाठी मुंबई, बेळगांवसह विविध ठिकाणांहून आलेल्या जैन श्रावक-श्राविकांनी गर्दी केली होती. संहितासुरी, भट्टारक शिरोमणी प. पूज्य डॉ. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या अधिपत्याखाली व कर्नाटक येथील जगद्गुरू स्वस्तिश्री प. पूज्य डॉ. देवेंद्रकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या उपस्थितीत सायंकाळी महामस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी दुग्धाभिषेक, इक्षूराभिषेक, चंदनचूर्ण, कुंकुमाभिषेक, हळदाभिषेक, अष्टगंध, पुष्पावृष्टी आदी महामस्ताभिषेक विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. राजू उपाध्ये, प्रशांत उपाध्ये, शशिकांत उपाध्ये, पद्माकर उपाध्ये यांच्या उपस्थित पूजाविधी संपन्न झाला. यावेळी धन्यकुमार जैन, अजित सांगावे, पद्माकर कापसे, धनंजय मगदूम, अशोक रोटे, नेमीनाथ कापसे, डॉ. धनंजय गुंडे, रावसाहेब देशपांडे यांच्यासह जैन श्रावक व श्राविका उपस्थित होते. दरम्यान, सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष व ध्वजारोहण करण्यात आले. भगवान चंद्रप्रभ तीर्थकरांचा पंचामृत अभिषेक व महाशांती मंत्र पठण करण्यात आले. दुपारी तीन वाजता डॉ. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींचे मंगल प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. चतुष्कोण (चार दिशेला) अभिषेकाचे मानकरी - शशिकांत दोशी व माणिकचंद दोशी (पंढरपूर), अशोक चौगुले (सांगली), डॉ. रवींद्र दोशी (फलटण). पाटील दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित श्री लक्ष्मीसेन मठाच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श दाम्पत्य-२०१७’ या पुरस्काराने जयसिंगपूर येथील प्रा. डी. ए. पाटील व विमल डी. पाटील यांना गौरविण्यात आले. महामस्तकाभिषेकाचे मानकरी-दुग्धाभिषेक - हर्षद शहाइक्षूराभिषेक - शांतीनाथ कांते, सुरेखा पाटील, विवेक शेटे (मिरज)कलकचूर्ण - जयप्रकाश पाटील (हालोंडी)कुंकूमाभिषेक - चंद्रकांत बंडू शेट्टी(सांगली), माधव उपाध्येकसबद्रव्य - माधव उपाध्ये (कोल्हापूर)हळदाभिषेक - नीळकांत जैनसर्वोषधी - मधुकर मगदूम (मुंबई), नीळकांत जैनअष्टगंध - संतोष मेहतापुष्पावृष्टी - शांतीनाथ शेट्टी (रायबाग)शांतीकोश - महावीर टोणे (पुणे)शांतीकलश व मंगल आरती - अजित कोळेकर