शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महाकाली देवी उत्सव साधेपणाने, पालखी सोहळाही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:28 IST

CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील साकोली परिसरात असलेल्या श्री महाकाली देवाचा उत्सव यंदा साध्या पद्धतीने व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऐन उत्सवाच्या काळात गुरुवारी देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले, तर  शुक्रवारी सायंकाळी प्रतिवर्षी होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहाकाली देवी उत्सव साधेपणानेपालखी सोहळाही रद्द

कोल्हापूर : येथील शिवाजी पेठेतील साकोली परिसरात असलेल्या श्री महाकाली देवाचा उत्सव यंदा साध्या पद्धतीने व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऐन उत्सवाच्या काळात गुरुवारी देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले, तर  शुक्रवारी सायंकाळी प्रतिवर्षी होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.श्री करवीर क्षेत्र माहात्म्य तसेच पौराणिक ग्रंथातून श्री महाकाली देवाचे वर्णन केले आहे. करवीर क्षेत्री आसुरांनी उन्माद मांडला होता, तेव्हा महाकाली देवीने श्री अंबाबाईच्या साक्षीने आसूरांचा वध केला करून भाविकांचे रक्षण केले होते. या देवीचे पौराणिक व प्राचीन मंदिर साकोली कॉर्नर परिसरात आहे. अनेक वर्षांपासून या मंदिरात महाकाली देवीचा उत्सव होत आहे. अक्षय तृतीयापासून हा उत्सव सुरू होऊन तो नवमीला पालखी सोहळ्याने समाप्त होतो.यंदा देवीच्या उत्सवातील पारंपरिक धार्मिक विधी रद्द करण्यात आले आहेत. नित्योचाराप्रमाणे अष्टमीच्या दिवशी देवीला गुरुवारी सकाळी महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा बांधण्यात आली. ही पूजा ओंकार गुरव यांनी बांधली. दुपारी बारा वाजता महाआरती होऊन देवीला पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी पार पडले. नवचंडी यज्ञ व महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.प्रतिवर्षी उत्सवात नवमी दिवशी सायंकाळी पाच वाजता महाकाली देवीचा पालखी सोहळा होता. या सोहळ्यात हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात; परंतु यावर्षी शुक्रवारी होणारा हा सोहळाच रद्द करण्यात आला आहे. फक्त नियमानुसार पालखी पूजन होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर