शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

‘टॉप थ्री’ खासदारांच्या यादीत महाडिक

By admin | Updated: May 1, 2016 00:49 IST

पी.आर.एस. संस्थेचा अहवाल : दिल्लीच्या वर्तुळात उमटविला ठसा; तिसऱ्या स्थानावरचा बहुमान

कोल्हापूर : खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर धनंजय महाडिक यांनी धडाकेबाज कार्यशैलीची आणि कर्तृत्वाची झलक दाखवली आहे. कोल्हापूर शहर, जिल्हा ते राज्य पातळीवरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने संसदेत मांडत खासदार महाडिक यांनी दिल्लीच्या वर्तुळात स्वत:चा ठसा उमटवला आहे. देशातील सर्व खासदार आणि आमदारांच्या कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या पी.आर.एस. इंडिया या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार खासदार महाडिक हे ‘टॉप थ्री’मध्ये पोहोचले आहेत. कोल्हापूरला अशा पद्धतीचा बहुमान प्रथमच लाभला.धनंजय महाडिक यांनी खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूरच्या स्थानिक प्रश्नांबरोबर इतर अनेक प्रश्न संसदेत मांडून त्यांनी कोल्हापूरचा आवाज बुलंद केला. कोल्हापूरच्या स्थानिक प्रश्नांपासून ते राज्य-राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न अभ्यासपूर्ण रीतीने मांडून महाडिक यांनी संसदेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. देशभरातील शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी महाडिक यांनी संसदेत आवाज उठविला. पंचगंगा नदी प्रदूषण, रेल्वेच्या प्रलंबित समस्या, कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील रस्ते उभारणी, महामार्गावरील समस्या, शैक्षणिक अभ्यासक्रमात वाहतुकीची शिस्त, महिलांचे आरोग्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करून ते प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावाही केला. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल विविध संस्थांनी घेतली आहे.पी.आर.एस. लेजिस्लेटिव्ह रिसर्च संस्था खासदार आणि सर्व राज्यातील आमदारांच्या कार्याचे मूल्यमापन करते. या संस्थेला सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेचे सहकार्य असते. पी.आर.एस.ने सर्व खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेतला. त्यात संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक तिसऱ्या स्थानावर आहेत. पावणेदोन वर्षांत मांडले तब्बल ४९५ प्रश्न ४खासदार महाडिक यांनी गेल्या पावणेदोन वर्षांत संसदेत ४९५ प्रश्न मांडले आहेत. त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्नांची दखल केंद्र शासनाने घेतली असून, अनेक मुद्द्यांवर कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे, धनंजय महाडिक हे लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. संसदेतील कसलाही अनुभव नसताना महाडिक यांनी दोन वर्षांतील कामांमुळे देशातील ‘टॉप थ्री’च्या खासदारांच्या यादीत स्थान मिळविले. ४टॉप थ्री खासदारांमध्ये प्रथम क्रमांकावर सुप्रिया सुळे, द्वितीय क्रमांकावर शिवाजीराव आढळराव-पाटील आणि तिसऱ्या स्थानावर धनंजय महाडिकांचे नाव आहे.