शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

महाडिक शहाणे की कोल्हापूरकर मूर्ख

By admin | Updated: October 19, 2015 00:53 IST

मुश्रीफांचा उपरोधिक सवाल : जोरदार शक्तिप्रदर्शनाने प्रचारास प्रारंभ; जाहीरनामा प्रसिद्ध

कोल्हापूर : वडील काँग्रेसचे आमदार, मुलगा भाजपचा आमदार, पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार असे महाडिक कुटुंब आहे. त्यामुळे ‘महाडिक शहाणे की कोल्हापूरकर व आम्ही मूर्ख’ असा उपरोधिक सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी उपस्थित केला. ‘आता कोण शहाणे हे या निवडणुकीत स्पष्ट होईल,’ असे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीचा प्रचार प्रारंभ व जाहीरनामा प्रसिद्धीकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी अर्थमंत्री, आमदार जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यावेळी प्रमुख उपस्थित होते. दसरा चौकात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी एकसंध आहे. दरम्यान, देशात वेगळी लाट असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांना निवडून आणण्यासाठी हाडाची काडे, छातीची ढाल केली; मात्र या निवडणुकीत त्यांच्यावर ‘धर्मसंकट’ आले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत ते नव्हते आताही नाहीत. राष्ट्रवादी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवित आहे. ताराराणी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक करत आहेत. ताराराणीच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. विरोधात रिंगणात असलेली काँग्रेस सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकाकी पडली आहे. सतेजची अवस्था ‘अभिमन्यू’सारखी झाली आहे. शिवसेनेवर न बोललेले बरं. पदोपदी अपमानित करूनही भाजपसोबत ते फरफटत जात आहेत. मुख्यमंत्र्यांना जाऊन निवेदन देत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे शासन आल्यानंतर असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. शाहूंच्या नगरीत समतेचा विचार मांडणारे गोविंंद पानसरे यांची हत्या करणारी प्रवृत्ती बेधडकपणे टी.व्ही.वर आपली बाजू मांडताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार दृढ करावयाचे असल्यास महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणे गरजेचे आहे.माजी मंत्री पाटील म्हणाले, एक वर्ष झाले तरी टोलमुक्त झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर असल्यामुळे निधी मिळत नसल्याचे वास्तव आहे. विदर्भ, मराठवाड्यात असते तर टोलचे पैसेही मिळाले असते आणि ‘स्मार्ट सिटी’तही कोल्हापूरचा समावेश झाला असता. सध्या कोल्हापूर प्रादेशिक वादाचे बळी ठरले आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील काहीही करत नाहीत. या शासनाने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल केले आहे. ‘कोंबडीपेक्षा डाळ महाग झाली आहे’. ऊस उत्पादकांना संपविले आहे. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा असलेल्या राष्ट्रवादीलाच महापालिकेत सत्ता द्यावी. माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, मी आणि मुश्रीफ यांनी पहिल्यांदा महापालिकेत पक्षीय राजकारणाला सुरुवात केली. विकासाची नवी दृष्टी दिली. गेल्यावेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील ८५ टक्के कामे पूर्ण केली आहेत. पुढील पाच वर्षांत सत्ता दिल्यास शहरातील शाहू मिलच्या जागेवर पर्यटन केंद्र सुरू केले जाईल. यावेळी शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के . पोवार यांचीही भाषणे झाली. ए. वाय. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, नामदेवराव भोईटे, उपमहापौर ज्योत्सना मेढे-पवार, नाविद मुश्रीफ, भैया माने, उत्तम कोराणे यांच्यासह राष्ट्रवादीचे ८० उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अनेक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शनाने कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली. ‘तोडपाणी’नंतरच निधी..तोडपाणी झाल्यानंतर दादांनी (पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील) विधानपरिषदेचा आमदार फंड खर्च केला आहे. खासगी विकसित केलेल्या ले-आऊटवर निधी खर्च करणारे दादा कोल्हापूरचा विकास काय करणार, असा सवाल मुश्रीफ यांनी केला. टीडी घोटाळा, आरक्षण उठविण्यासाठी दलालांना सत्ता हवी, असाही आरोप ‘ताराराणी’वर त्यांनी केला. सनातन संस्था निर्भिड..अ‍ॅड. पानसरे यांच्या हत्याप्रकरणी समीर गायकवाडला अटक केली आहे. तो सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ भाजपचे शासन असल्यामुळेच सनातन संस्थेचे लोक निर्भिडपणे टी.व्ही. चॅनेलवर येऊन आपली बाजू मांडत आहेत, असा आरोप माजी मंत्री पाटील यांनी केले. कसे सहन केले ? ताराराणी आघाडीने महापौर, उपमहापौरपदाची खांडोळी केली. तीन महिन्यांचा महापौर, दोन महिन्यांचा उपमहापौर अशी पदे वाटली. राज्यात हा विषय चेष्टेचा झाला होता. कोल्हापूरच्या स्वाभिमानी, चाणाक्ष लोकांनी हे कसे सहन केले, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. ---------------------------------१८१०२०१५- कोल- एनसीपी०१कोल्हापुरातील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रविवारी आयोजित महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ आणि जाहीरनामा प्रसिद्धी कार्यक्रमास अशी गर्दी झाली होती. ............................................................१८१०२०१५- कोल- एनसीपी- एनसीपी०२कोल्हापुरातील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आणि जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी रविवारी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर सर्व उमेदवारांची अशी रांगेत बसण्याची व्यवस्था केली होती. (सर्व फोटो - दीपक जाधव)...........