शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक म्हणतात...‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:45 IST

आपण कोणाशी बोललो नाही, ज्यांचा पंतप्रधान करायचा आहे, ते बघतील. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सांभाळतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी आपण सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याची टिपण्णी केली होती. त्यावर खासदार महाडिक यांनी असे प्रत्युत्तर देवून सतेज पाटील यांची मनधरणी करणार नसल्याचेच स्पष्ट केले.

ठळक मुद्दे‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील  : महाडिक यांची टिप्पण्णीखासदार महाडिक यांची टिप्पण्णी : त्यांचा विरोध अपेक्षितच : मुश्रीफ

कोल्हापूर : आपण कोणाशी बोललो नाही, ज्यांचा पंतप्रधान करायचा आहे, ते बघतील. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सांभाळतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी आपण सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याची टिपण्णी केली होती. त्यावर खासदार महाडिक यांनी असे प्रत्युत्तर देवून सतेज पाटील यांची मनधरणी करणार नसल्याचेच स्पष्ट केले.कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या व्यासपीठावर,अशी विचित्र परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, ती दुरुस्त करण्यास वेळ कशाला घालवायचा..? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. आमदार सतेज पाटील यांचा विरोध अपेक्षितच होता, त्यांच्यासह वरिष्ठांशी संपर्क साधला नाही; खासदारांनीच साधला असेल तर आपणाला माहिती नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आमदार मुश्रीफ म्हणाले, मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक बोलावून त्यांच्या चर्चा करून प्रचाराची रणनीती ठरविली जाणार आहे.

कागलमध्ये आपण, राधानगरी-भुदरगडमध्ये के. पी. पाटील व ए. वाय. पाटील; तर चंदगड मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर हे उद्यापासूनच प्रचारास सुरुवात करतील. जिथे राष्ट्रवादीची ताकद कमी आहे, त्या ‘करवीर’मध्ये मधुकर जांभळे, ‘उत्तर’मध्ये आर. के. पोवार, तर ‘दक्षिण’मध्ये स्वत: महाडिक गावागावांत जाणार आहेत. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास उपस्थित होते.अमल महाडिक उघड प्रचार करतीलभाजपचे आमदार अमल महाडिक हे खासदार महाडिक यांचे भाऊ आहेत. भाऊ निवडणूकीस उभा राहिल्याने ते उघड प्रचार करतील, त्यात लपविण्यासारखे काय आहे? असे मुश्रीफ यांनी सांगितले.

आघाडीची घोषणा लवकर अपेक्षितकॉँग्रेससोबतची आघाडी निश्चित असली तरी प्रचारात सक्रिय करण्यासाठी लवकर निर्णय अपेक्षित आहे. आघाडीत शेकाप, जनता दल, रिपाइं (गवई व कवाडे गट) हेही पक्ष असून, त्यांनाही प्रचारात सक्रिय करावे लागणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर