शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीत डच्चू मिळालेले महाडिक एकमेव

By admin | Updated: December 10, 2015 01:28 IST

राज्यातील चित्र : आठ जागांवर लढती; सहा जागांवर आघाडीची विद्यमानांनाच उमेदवारी

विश्वास पाटील--कोल्हापूर --जानेवारीत मुदत संपणाऱ्या विधान परिषदेच्या राज्यातील आठ जागांची निवडणूक होत आहे; परंतु त्या आठपैकी पक्षाने उमेदवारी डावलेले आमदार महादेवराव महाडिक हे एकमेव आहेत. अन्य सात ठिकाणी त्या-त्या पक्षांनी विद्यमान आमदारांनाच संधी दिली आहे. नागपूर मतदार संघातूनही काँग्रेसचा उमेदवार बदलला आहे; परंतु तिथे मावळते आमदार राजेंद्र मुळक यांनी स्वत:हूनच आपल्याला उमेदवारी नको, असे स्पष्ट केले होते.राज्यात मुंबईच्या दोन, सोलापूर, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलडाणा, अहमदनगर आणि नागपूर या विधान परिषदांच्या जागांची मुदत १ जानेवारी २०१६ ला संपत आहे. त्यातील आठपैकी सात जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काँग्रेस मुंबईतील एक, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार आणि नागपूर या जागा लढवत आहे. मुंबईतील एक जागा दोन्ही पक्षांनी सोडली आहे. काँग्रेसने मुंबईतून आमदार भाई जगताप यांना पुन्हा संधी दिली. धुळे-नंदूरबारमधून अमरिष पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कोल्हापुरात मात्र विद्यमान आमदार महाडिक यांचा पत्ता ‘कट’ करून त्यांच्याऐवजी पक्षाने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर विश्वास दाखविला आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला तीन जागा आल्या असून त्यावर सोलापुरातून पक्षाने दीपकराव साळुंखे यांना, अहमदनगरमधून अरुणकाका जगताप या विद्यमान सदस्यांना संधी दिली. पक्षाने अकोला-बुलडाण्यातून रवींद्र सपकाळ या नव्या कार्यकर्त्यास संधी दिली आहे.आठ जागांवर भाजपचा एकही विद्यमान आमदार नाही. या पक्षाने नागपूरमधून गिरीष व्यास यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडे मुंबईतील एक व अकोला-बुलडाण्याची जागा होती. तिथे अनुक्रमे पर्यावरणमंत्री रामदास कदम व आमदार गोपीकिसन बजोरिया यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली.मर्यादित मते असलेल्या मतदार संघांत विद्यमान आमदारांची पकड असते. त्यांना धक्का देणे शक्य नसते म्हणून पक्षही सहसा उमेदवार बदलण्यात राजी नसतात परंतु कोल्हापुरात मात्र हे घडले आहे. दिल्लीसह मुंबईतील नेतृत्वाशी असलेले संबंध, निवडून येण्याची क्षमता, राजकीय व आर्थिक ताकद आणि तरुण नेतृत्व या निकषांवर सतेज पाटील यांनी उमेदवारी पटकावली आहे.