शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांनी पालकत्वाचा शब्द पाळला

By admin | Updated: July 19, 2016 00:53 IST

निकिताच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा : नोकरी, लग्न, शिक्षणाचा खर्च उचलण्याची हमी

कोल्हापूर : येथील बोंद्रेनगर, धनगरवसाहतमधील पल्लवी बोडेकर या युवतीच्या आत्महत्येनंतर निराधार झालेली तिची बहीण निकिता हिच्या पालकत्वाच्या घेतलेल्या जबाबदारीचा शब्द माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पाळला. महाडिक यांनी सोमवारी निकिताच्या खर्चासाठी तिच्या नावे यूथ डेव्हलपमेंट बँकेत बचत खाते काढून त्यावर रोख ५० हजार रुपये जमा केले. १९ जून रोजी बोंद्रेनगरातील धनगर वसाहत येथील पल्लवी बोडेकर या युवतीने आत्महत्या केली होती. त्यामुळे तिची बहीण निकिता ही निराधार झाली. माजी आमदार महाडिक यांनी तिच्या घरी भेट देऊन तिच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. महिनाभर निकिताला मदत मिळाली नसल्याने ‘लोकमत’मध्ये निकिताच्या मदतीचे हात रितेच’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन महाडिक यांनी तातडीने सोमवारी तिला आर्थिक मदत केली.सकाळी महाडिक यांनी निकिता बोडके हिला तिच्या नातेवाइकांसह गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बोलावून घेऊन तिची विचारपूस केली. तिच्या सोबत तिचे चुलते आबाजी बोडेकर, विठ्ठल बोडेकर, कोयाप्पा बोडेकर, चुलतभाऊ राजू बोडेकर व मामा रामचंद्र शेळके, आदी नातेवाईक उपस्थित होते. तिच्या नावे यूथ बँकेच्या प्रधान कार्यालयात खाते उघडून तिच्या दैनंदिन गरजा व घरखर्चासाठी म्हणून खात्यावर रोख ५० हजार रुपये जमा केले. तिला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तातडीने बँकेत नोकरीला घेण्याची तसेच यापुढील तिचा दैनंदिन खर्च आणि लग्नाच्या खर्चाची जबाबदारीही उचलली. सध्या निकिता १२ वीमध्ये शिक्षण घेत असल्याने तिच्या क्लासेसची फी भरण्याची जबाबदारीही उचलली. संगणक शिक्षण घेण्याचाही सल्ला देत पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी उचलली. यापुढे कोणतीही कमतरता भासल्यास थेट मला फोन करावा, अथवा त्या भागातील कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांना अडचणी सांगाव्यात, असेही त्यांनी तिला सांगितले. यावेळी विजयसिंह देसाई, बाजीराव किल्लेदार, नीलेश देसाई, बयाजी शेळके, तानाजी फाले, राजू आडुळकर, विकी जाधव, सोनबा फाले, विठ्ठल लांबोडे, रघू पाटील आणि बोंद्रनगर, धनगरवसाहत परिसरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन् निकिता गहिवरलीमहाडिक यांनी निकिताच्या डोक्यावर हात ठेवून तिला मायेचा आधार दिला. त्यावेळी तिला गहिवरून आले. याप्रसंगी निकिताला आपले अश्रू लपविता आले नाहीत. महाडिक यांनी तिचे अश्रू पूसत ‘तू निराधार नाहीस, आम्ही सोबत आहोत, काळजी करू नकोस’, अशा शब्दांत तिला आधार दिला. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले होते. महाडिक यांच्या या मदतीबद्दल निकिताच्या नातेवाइकांनी महाडिक यांचे आभार मानले.