शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 महाडिकांना करवीर, कागल, तर मंडलिकांना चंदगड, उत्तर ‘घातक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:26 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक हे गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘करवीर’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘दक्षिण’ ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक हे गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘करवीर’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘दक्षिण’ मतदारसंघातील मताधिक्याच्या बळावर विजयापर्यंत पोहोचले; पण आता परिस्थिती वेगळी असून, त्यांच्या दृष्टीने ‘करवीर’ व ‘कागल’ सर्वांत घातक ठरण्याची शक्यता आहे. विरोधी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासमोर गेल्या निवडणुकीत पाठीशी राहिलेले ‘कोल्हापूर उत्तर’ व ‘चंदगड’ मतदारसंघातील मताधिक्य टिकवणे व उर्वरित ठिकाणी मताधिक्य मिळविण्याचे आव्हान राहणार आहे.लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होऊन, पूर्वीच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील राधानगरी-भुदरगड तालुक्यांचा समावेश ‘कोल्हापूर’मध्ये झाला. पुनर्रचित मतदारसंघात राष्टÑवादीने विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी डावलून संभाजीराजे यांना दिली; त्यामुळे मंडलिक यांनी बंडखोरी केली. शिवसेनेकडून विजय देवणे रिंगणात होते. तिरंगीत झालेल्या लढतीत मंडलिक यांनी बाजी मारत कोल्हापूरच्या राजकारणात इतिहास घडविला. २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीकडून धनंजय महाडिक, शिवसेनेकडून संजय मंडलिक, तर डाव्या आघाडीकडून संपतराव पवार रिंगणात राहिले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाडिक यांनी ती परतावून लावत राष्टÑवादीचा बालेकिल्ला अभेद्य असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीत महाडिक यांच्या मताधिक्यात ‘करवीर’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘कोल्हापूर दक्षिण’चा मोठा वाटा होता. आता पुन्हा याच मल्लांत निकराची झुंज होत आहे. सध्यस्थितीत सहा विधानसभा मदारसंघांपैकी शिवसेनेकडे तीन, भाजपकडे एक आणि राष्टÑवादीकडे दोन आहेत. त्यात कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी हातात ‘धनुष्यबाण’ घेतल्याने मंडलिक यांची हवा तयार झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ही हवा असली तरी ती मतपेटीपर्यंत पोहोचेल का? महाडिक यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे, अरूंधती महाडिक यांचा महिलांशी असलेला थेट संपर्क आणि महाडिक म्हणून संपूर्ण मतदारसंघात असलेले नेटवर्क यासमोर ही ‘हवा’ टिकाव धरणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ‘कागल’ व ‘कोल्हापूर’ शहरातील मताधिक्य कोण घेतो, त्यांना कशा प्रकारे रोखले जाते, यावरच निकाल फिरणार हे निश्चित आहे.पाचव्यांदा कोल्हापूरात : निवडणूक गांभीर्याने( पान १ वरुन) क्रमप्राप्त राहिले; त्यामुळे इतर पक्षांतील कार्यकर्ते दुखावलेच; पण राष्टÑवादीचे नेते व कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. त्यातूनच महाडिक यांच्या उमेदवारीला शेवटपर्यंत विरोध झाला. विरोधाचे वातावरण निवळेल, असा अंदाज होता; पण तसे न झाल्याने पवार यांनी दुरुस्त्यांसाठी जोरदार प्रयत्न केले. मुंबईत एक-दोन बैठका घेतल्या, त्याचबरोबर निवडणुकीच्या अगोदर गडहिंग्लज येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांंशी शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. त्यानंतर वातावरण सुधारत नाही म्हटल्यानंतर दोन्ही कॉँग्रेससह मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा रामकृष्ण हॉल येथे मेळावा घेतला. मुक्कामास राहून त्यांनी अनेक जोडण्या लावल्या. ७ एप्रिलला कोल्हापुरात आले होते. दोन दिवस ते मुक्कामास राहिले. ‘कोल्हापूर’ मतदारसंघात कोण काय करतो, काय परिस्थिती आहे, याची रोज माहिती त्यांच्यापर्यंत पुरविणारी यंत्रणा कार्यरत आहे. पक्षांतर्गत विरोध असताना आपण उमेदवारी दिल्याने दगाफटका होऊ नये म्हणून ते सतर्क आहेत.धनंजय महाडिकांची शक्तिस्थाने : हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, संध्यादेवी कुपेकर, भरमूअण्णा पाटील, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, बजरंग देसाई, संपतराव पवार, रवींद्र आपटे, अशोक चराटी, अरुण डोंगळे, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार.संजय मंडलिकांची शक्तिस्थानेचंद्रकांत पाटील, संभाजीराजे, सतेज पाटील, संजय पवार, विजय देवणे, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, संग्राम कुपेकर, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, उत्तम कांबळे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक