शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

महाडिक-बंटी, आवाडे-आवळे वादात दोषी धरण्यातच आयुष्य संपले  : पी. एन. पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:57 IST

कोल्हापूर : कॉँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत महादेवराव महाडिक- सतेज (बंटी) पाटील, प्रकाश आवाडे-जयवंतराव आवळे, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव यांच्यासह ...

ठळक मुद्दे महाडिक-बंटी, आवाडे-आवळे वादात दोषी धरण्यातच आयुष्य संपले  : पी. एन. पाटील जिल्हा परिषदेची सत्ता तुमच्यामुळेच गेली : आप्पासो खोचगेंची आवाडेंना विचारणा

कोल्हापूर : कॉँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत महादेवराव महाडिक- सतेज (बंटी) पाटील, प्रकाश आवाडे-जयवंतराव आवळे, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील वादाला मलाच दोषी धरण्यात आले. यामुळे माझे राजकीय नुकसान झालेच; पण दोषी धरण्यातच माझे आयुष्य संपल्याची सल कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बोलून दाखविली.प्रदेश कॉँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पी. एन. पाटील यांचा सत्कार रविवारी कॉँग्रेस कमिटीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे बोलत असताना ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासो खोचगे यांनी त्यांना रोखले. ‘तासात एक बोलता, जिल्हा परिषदेची सत्ता कोणामुळे गेली?’ असा सवाल केल्याने कॉँग्रेस कमिटीतील वातावरण तणावपूर्ण बनले.पक्षांतर्गत गटबाजीवर बोट ठेवत माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, ‘कॉँग्रेसचा पराभव करण्याची हिंमत शिवसेना-भाजपमध्ये नाही. आम्हीच एकमेकांच्या पायात पाय घातल्याने जिल्ह्यात एकही आमदार नाही.

आवाडे आणि आम्ही हातात हात घालून काम करण्याचे ठरवले आहे. हाच धागा पकडत प्रकाश आवाडे म्हणाले, नेत्यांमधील मतभेद मिटले असून पक्षसंघटना मजबूत करणार आहे. कोणीच पायात पाय घालण्याचे राजकारण करणार नाही.’ आवाडे यांना मध्येच रोखत ‘तासात एक बोलता, जिल्हा परिषदेची सत्ता तुमच्यामुळेच गेली,’ अशी विचारणा ज्येष्ठ कॉँग्रेस कार्यकर्ते आप्पासो खोचगे यांनी केल्याने तणाव निर्माण झाला.

प्रकाश आवाडे यांनी तितक्याच संयमाने उत्तर देत, ‘मने मोकळी झाली पाहिजेत.’ असे ते म्हणाले. विचारल्याबद्दल खोचगेंचे कौतुक करत, ‘जिल्हा परिषदेत सत्ता का आली नाही हे जयवंतराव आवळे व पी. एन. पाटील यांना विचारा.

माझे आयुष्य कॉँग्रेसमध्ये गेले असताना राहुल आवाडेंना पक्षाची उमेदवारी डावलली जाते, त्यावेळी काय वाटले असेल? पण तेही विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आत एक, बाहेर एक आपण कधीच बोलत नसल्याचे सांगत बाजीराव खाडे दिल्लीत, पी. एन. पाटील मुंबईत, सतेज पाटील विधान परिषदेत आणि आपण जिल्ह्यात आहे, सगळे मिळून विरोधकांची भट्टी लावूया,’ असे आवाहन आवाडे यांनी केले.पी. एन. पाटील म्हणाले, कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची वीस वर्षे आवाडे-आवळे, महाडिक-सतेज पाटील, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव, उदयसिंगराव गायकवाड-संजीवनीदेवी गायकवाड, विक्रमसिंह घाटगे-संजय घाटगे यांच्यातील वादाला मलाच दोषी धरले.

यामुळे माझे राजकीय नुकसान झाले असून दोषी धरण्यातच माझे आयुष्य संपले. ‘प्रकाशअण्णा, राहुलला उमेदवारी मी नाकारली नाही. इचलकरंजी नगराध्यक्षपद आवळेंना हवे होते, पण ते तुम्ही दिले नसल्याने आवळेंनी त्यांच्या मतदारसंघात राहुल यांचे तिकट कापले, यात माझा दोष काय? आजपर्यंत सूडबुद्धीने राजकारण कधी केले नाही. येथून पुढे तुमच्या खांद्याला खांदा लावून कॉँग्रेस बळकटीचे काम करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष चेष्टा करीतआवाडे-आवळे वाद केवळ जिल्हापुरता मर्यादित नव्हता. तो राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे प्रदेश कॉँग्रेस कमिटीत गेलो की ‘या आवाडे-आवळे’ अशी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चेष्टा करीत असल्याचे आवळे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत चूक झालीजिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत चूक झाल्याचे सांगत ‘राहुल (राहुल पी. पाटील) पुढील अडीच वर्षांसाठी कोणतीही चिठ्ठी येऊ दे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा कॉँग्रेस-राष्ट्रवादीचाच होईल,’ असे आवाडे यांनी सांगितले.

पक्षात घ्या; पण जरा पारखूनपक्षातून बाहेर गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून याबाबत निर्णय घेऊया, असे आवाडे यांनी सांगितले. यावर ‘साहेब, पक्षात घ्या; पण जरा पारखून. संधिसाधूपासून सावध रहा,’ असे विश्वास शिंदे (कणेरी) यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर