शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘महाबीज’च्या बियाण्यांच्या दरात ५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:11 IST

कोल्हापूर : महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे. सोयाबीनचे २५५६ क्विंटल, ...

कोल्हापूर : महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे. सोयाबीनचे २५५६ क्विंटल, तर भाताचे १९९८ क्विंटलचे बियाणे उपलब्ध आहे. ज्वारी व कडधान्याच्या पेरणीस अद्याप वेळ असल्याने त्यांचे बियाणे आलेले नाही.वळवाचा पाऊस नसल्याने खरीप पेरण्यांसमोर अडचणी आल्या आहेत. मशागतीची कामे अद्याप धिम्या गतीने सुरू झाली असून बांध धरणे, शिवारातील धसकट (पाला-पाचोळा) वेचण्यात शेतकरी मग्न आहेत. वळीव पाऊस झाला की मशागतीच्या कामांना वेग येणार आणि धूळवाफ पेरण्या सुरू होतील. त्यादृष्टीने कृषी विभागाने तयारी केली असून, बियाण्यांची उपलब्धता करून ठेवली आहे. भाताची धूळवाफ पेरणीसाठी भाताचे विविध वाण उपलब्ध असून, ३३४५ क्विंटल भात बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी १९९८ क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीन बियाण्याची २५५६ क्विंटलची आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ‘जे-३३५’ या वाणाचे १७०४ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यंदा बियाण्यांच्या दरात सरासरी ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्वारी, तूर, मूग, उदीड, बाजरीच्या पेरणीस अद्याप वेळ असल्याने बियाणे आलेले नाही. येत्या आठ-दहा दिवसांत या बियाण्यांची आवक होईल.किलोमागे १० ते २५ रुपये अनुदानमहाबीजच्या सर्वच वाणांना अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. सात/बारा, आधार कार्ड घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वजा करून बियाणे द्यायचे आहे. संबंधित विक्रेत्याला नंतर अनुदान देते.अनुदानाशिवाय भात बियाण्यांचे दरबियाणे किलो दरकर्जत-९, आर-२४ ४०कर्जत-२, जया ३८कर्जत-७ ३४इंद्रायणी ५०भोगावती, फुले समृद्धी, ४८एचएमटीभुईमुगाचेबुकिंगच नाहीजिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्र मोठे आहे; पण गेल्या दोन वर्षांपासून महाबीजकडे भुईमूग बियाण्याची मागणीच शेतकरी करीत नाही. बहुतांशी शेतकरी स्वत:कडीलच बियाणे वापरत आहेत.३९ हजार टन खत उपलब्धखरिपासाठी १ लाख ४४ हजार ८८० टन खत मंजूर आहे. आतापर्यंत ३९ हजार टनांची आवक झाली असून, यंदा खताची टंचाई भासणार नसल्याचा अंदाज आहे.