गुडाळ (ता. राधानगरी) येथे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना व स्वप्नील पाटील फाउंडेशन यांच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ए. वाय. पाटील बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक स्वप्नील पाटील यांनी केले. यावेळी दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमापूजन व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ए. वाय. पाटील, भोगावतीचे माजी संचालक महादेवराव कोथळकर, माजी सरपंच अभिजीत पाटील, माजी जि.प सदस्य बापूसोा पाटील, माजी सभापती दिलीप कांबळे, प्रकाश मोहिते, बँक निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी रामचंद्र चौगले, मुख्याध्यापक बी. जी. पाटील, उपसरपंच दत्तात्रय कोथळकर, उपसभापती मोहन पाटील, गौतम कांबळे, दीपक पाटील, संदीप मालप, डॉ. सागर बाटे, डॉ. उमा बाटे, उदय कांबळे, बळी मोहिते उपस्थित होते.
गुडाळ आरोग्य शिबिर
गुडाळ (ता. राधानगरी) येथे कोरोना योद्धा सन्मान व महाआरोग्य शिबिराप्रसंगी ए. वाय. पाटील यांनी संबोधित केले. यावेळी अभिजीत पाटील, दत्तात्रय कोथळकर, बापूसोा पाटील, दिलीप कांबळे, प्रकाश मोहिते आदी उपस्थित होते.