शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी दादांची गुगली

By admin | Updated: November 11, 2015 00:54 IST

‘भाजप-ताराराणी’ची बैठक : घोडेबाजार, धमक्यांना थारा नाही : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : ‘महापौर आमचाच होणार,’ असा दावा करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर आणि उपमहापौर या दोन्हीही पदांसाठी भाजप आणि ताराराणी या दोन्हीही पक्षांतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय गुगली टाकली. महापौर निवडणुकीत आम्ही घोडेबाजार करणार नाही, सत्ता आहे म्हणून कोणालाही धाक दाखविणार नाही, सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता आणू, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महापौर व उपमहापौरपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाजप आणि ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची बैठक मंगळवारी दुपारी येथील एका हॉटेलवर घेण्यात आली. यावेळी महापौरपदासाठी सविता भालकर, गीता गुरव, मनीषा कुंभार, स्मिता माने, सविता घोरपडे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून भाजपच्यावतीने सविता भालकर आणि उपमहापौरपदासाठी संतोष गायकवाड तसेच ‘ताराराणी’कडून स्मिता माने आणि उपमहापौरपदासाठी राजसिंह शेळके यांची नावे निश्चित करण्यात आली. याबाबतची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ‘ताराराणी’चे अध्यक्ष स्वरूप महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी महापौर सुनील कदम, सुहास लटोरे, सुनील मोदी हे उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री पाटील म्हणाले, कोणीही गंभीर होऊ नये कोणत्याही परिस्थतीत महापौर आमचाच होणार आहे. आज आम्ही डावपेचातील पत्ते खुले करणार नाही, केवळ प्रयत्न करू म्हणून उपयोग होणार नाही, ‘महायुती’च्या नगरसेवकांनीही यासाठी हालचाली करणे महत्त्वाचे आहे. येत्या सहा दिवसांत बाहेरगावी कोणीही जायचे नाही, ‘ताराराणी’चा महापौर झाला तरीही तो भाजपचा मानू, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यामुळे महापौर हा भाजप-ताराराणी आघाडीचाच करण्याचा संकल्प करू, यासाठी आध्यात्मिक शक्ती आपण वापरणार आहोत, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.या बैठकीला भाजप-ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या चौघा उमेदवारांसह त्यांचे उमेदवारी अर्ज घेऊन विजयराव सूर्यवंशी, नीलेश देसाई, ईश्वर परमार, आशिष ढवळे, सत्यजित कदम हे महानगरपालिकेत गेले व तेथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. (प्रतिनिधी)खुर्चीचे राजकारण : विकासासाठी आटापिटाकाँग्रेस आघाडीला पूर्ण बहुमत असताना चंद्रकांतदादांचा उगाचच आटापिटा सुरू असल्याच्या सतेज पाटील यांच्या टीकेवर उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले, मग तुमचा आटापिटा कशासाठी? आमचा अटापिटा हा शहराच्या विकासासाठी आहे, केंद्र, राज्यातही भाजपची सत्ता असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेतही भाजपची सत्ता आल्यास विकास निधीची कमतरता भासणार नाही. महापौर करण्याबाबत मी विरोधकांना अगर त्यांच्या नेत्यांना भेटलेलो नाही. मी राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांना आमचा महापौर करण्याबाबत साथ देण्याचे आवाहन केले आहे. सतेज पाटील भलतेच चतुरकाँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे भलतेच चतुर आहेत. त्यांनी प्रत्येक नगरसेवकांना दीपावली भेट म्हणून मिठाई पाठविली आहे. त्यामुळे ते साधे नाहीत, त्यांची मिठाई म्हणजेच हे महापौरपदासाठी काँग्रेसला मदत करण्याचे आमिष नगरसेवकांना दाखविले आहे, असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत सांगितले.