शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘बेगोनिया’च्या नवीन जातीस मधुकर बाचूळकर यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:38 IST

कोल्हापूर : पश्चिम घाटातील शोभिवंत वनस्पती बेगोनिया प्रजातींचा अभ्यास करताना कोल्हापुरातील ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि ...

कोल्हापूर : पश्चिम घाटातील शोभिवंत वनस्पती बेगोनिया प्रजातींचा अभ्यास करताना कोल्हापुरातील ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि छत्रपती शहाजी महाविद्यालयातील वनस्पती विभागप्रमुख डॉ. मकरंद मो. ऐतवडे यांना केरळमधील निलयमपत्ती, पलक्कड या ठिकाणी डिसेंबर २०१२ साली बेगोनियाची एक जात आढळून आली. या प्रजातीस वनस्पतितज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांचे नाव देण्यात आले ‘बेगोनिया बाचूळकरी’ अशी या प्रजातीची ओळख असेल.बेगोनिएसी कुळातील बेगोनिया या जातीतील वनस्पती जगभरात शोभिवंत वनस्पती म्हणून सर्वज्ञात आहेत. जगभरात बेगोनियाच्या १० हजार जाती लागवडीखाली आहेत. याबरोबरच त्यांचे अनेक जंगली, लागवडीखालील आणि संकरित वाण शोभिवंत, खाद्य आणि औषधी गुणधर्माचे आहेत. सर्व संदर्भांचा आढावा घेतल्यानंतर भारतासाठी बेगोनिएसी कुटुंबामध्ये बेगोनिया ही एकच प्रजात असून, त्यात साधारणपणे ६७ जाती नोंद आहेत, असे लक्षात येते. पश्चिम घाटातील बेगोनियाच्या जाती मर्यादित ठिकाणीच आढळतात. त्यातील बहुतांश जाती प्रदेशनिष्ठ आहेत, तर काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत यादव व ऐतवडेकर यांनी सखोल अभ्यास केल्यानंतर ही जात ‘बेगोनिया फ्लोसिफेरा’ या जातीशी आप्तभाव दर्शविते असे आढळून आले. त्याबाबतचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘फायटोटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला.‘बेगोनिया बाचूळकरी’ साधारणपणे ५०-६० सेंटीमीटर उंच असून, ती ओलसर ठिकाणी दमट हवामानात दगडांच्या फटींमध्ये वाढते. या वनस्पतीस जमिनीच्या वर खोड नसून ते रूपांतरित मूलक्षोड स्वरूपात जमिनीखाली आढळते. ही वनस्पती संकलित करण्यासाठी थ्रिसूर, केरळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जोसेफ कट्टुकुनेल यांची मदत झाली. या संशोधनामध्ये डॉ. शरद कांबळे, रोहित माने, जगदीश दळवी यांचे सहकार्य लाभले. डॉ. बाचूळकर यांनी गेली अनेक वर्षे वनस्पती वर्गीकरणशास्त्र, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण या क्षेत्रात काम केले आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘बेगोनिया बाचूळकरी’ हे नाव देण्यात आहे, असे प्रा. यादव आणि डॉ. ऐतवडे यांनी सांगितले.‘बेगोनिया बाचूळकरी’ची वैशिष्ट्येखोड जमिनीखाली रूपांतरित मूलक्षोड स्वरूपात, आकर्षक फुलोरे आणि गुलाबी फुले, मर्यादित ठिकाणीच अस्तित्व, फुले व फळे नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतात.