शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

लायनीत कलकल... पंक्चर सायकल....

By admin | Updated: January 6, 2017 00:24 IST

फुल्ल बाजा

नमस्कार मंडळी.. बाज्याचा तुमा समद्यास्नी रामराम! ह्यापूर्वी कानाकंडं परिचित हुतो.. आता डोळ्यास्नी भेटाय येतोय. काय लै फरक न्हाई. कानाला खडा लावायचा आनि डोळ्यात तेल घालून वाचायचं. राहता राहिली ल्यांगवेज... तर ती आपली पैल्यापास्नं अशीच.. गल्लीतली! ष्टाईल बी तीच... कळ तर काडायची.. खरं दुखाय न्हाई पायजे! आणि काय लागलं तर ओके भाऊ हाईतच की पाठीशी!तर परवा काय झालं... सकाळी धुकं लै पडल्यालं. लवकर उठलो आनि आदी लायनीत जाऊन हुबारलो. व्हय... नंतरनं लायनीत गर्दी वाढायच्या आत सकाळी उठून नंबर लावल्याला बरा असतोय, असा हल्लीचा अनुभव हाय. पाठूपाठ टाय लावल्याला एक सायेब गडबडीनं माज्या मागं यून हुबारला. तवर तेच्या मागनं आनि धा बाराजण यून लायनीत हुबारली. खरं लाईन काय केल्या फुडं सरकंना. हुबं राहून राहून पायाच्या पार खुट्ट्या मोडायची येळ आली.माज्या मागल्या टाय लावल्याल्या सायबानं तर वैतागून माज्या हातातील पान्याची बाटली मागितली आनि काय बोलायच्या आत गटटाटा पिऊन आर्धी सपिवली बी. तवर धुकं हटलं आनि माजा नंबर बी आला. आर्धी शिल्लक राहिलेली बाटली घ्यून पायरी चढून मी वर आलो आनि दरवाजा लावून घ्यायला मागं वळून बगतो तर काय!माज्या मागं हुबारल्याली समदी फेंदारल्यागत माज्या डोस्क्यावरल्या ‘सुलभ शौचालया’च्या पाटीकडं बगत्याली!आर्धी बाटली गटटाटा संपिवल्याला सायेब माज्याकडं खाऊ की गिळू या नजरंनं का बगत असावा, हेचा ईचार करतच मी कडी घातली.जाऊंदे तिकडं म्हटलं मनात. आपली अडचन झाली तरी पिल्या पान्याचं उपकार आपून काडायला नगोत.अंघोळ बिघोंळ आवरून रिक्षा काढायला बाहेर पडतोय तर दारात उत्तरेश्वरातला अखिलेश हुबा. म्हटलं, काय रे बाबा.. येरवाळीच आलाईस! तर मुलायम आवाजात म्हंटला, तुमच्या गल्लीत आल्तो शिवपाल काकांकडं, तर तेंच्या दारातच ‘सायकल’पंक्चर झाली. म्हनून मग तुजी आठवन झाली. तुज्या वळकीचा कोन पंक्चर पेशालिस्ट आसला तर बग की! म्हटलं, ‘आमच्याकडं एक पेशालिस्ट हाईत. ‘घड्याळ’ लावून दोन मिंटात तुजी सायकल दुरुस्त करतील, पन तेंची फी तुला परवडायची न्हाई.’ पटत नसंल तर तुमच्या आबांना जाऊन ईच्चार. तेंच्या जुन्या वळकीतलं हाईत ते! आबांचं नाव काडलं तस अखिलेश फेंदारलंच. म्हनला, बाबा, आबांचं नाव एवढं नाव काढू नगोस बाबा. तेंचीच ‘सायकल’ पळवून आनलिया मी!आरं मग पंक्चर कशानं झाली, मी ईचारलं. ‘डब्बलसीटमुळं’. ‘डब्बलसीट?’व्हय.. आबा सांगत हुतंत. तरीबी तेंची नजर चुकवून रामगोपाल काकास्नी डब्बलसीट घेतलं आनि समदा घोळ झाला.आता निस्तारायचा कसा ते सांग. म्हटलं, लै टेन्शन घ्यू नगोस. तुमच्या उत्तरेश्वरातच एक भाद्दर हाय. त्यो काडून दिल तुज्या सायकलचं पक्चर. ‘कोन?’ ‘अमर अ‍ॅण्ड कंपनी’.कोन अमर अ‍ॅण्ड कंपनी? नगोरे बाबा. एकतर तेंनी सायकलचं दुकान बंद करून फटाक्याचं दुकान टाकायच्या नादात हाईत आणि दुसरं म्हंजे आमच्या आबांच्या संध्याकाळच्या बैठकीतलं हाईत. पंक्चर राहील बाजूला. सायकल गायब करतील आनि नवी घंटी लावून आबांच्यासमोर पेश करतील. शेवटी अखिलेशला म्हटलं भावा, तुज्या भावकीतला आनि पै पावन्यातला तिडा लै दांडगा हाय. माज्याच्यानं निस्तरायचा न्हाई. तू तुज्या सायकलला नवीन टायर बशीवल्यालंच बरं. दुकान शक्यतो शाहूपुरीतलंच बघ आनि मी रिक्षा काढली.भरत दैनी