शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

शिवकालीन तलावास पर्यटनाचा लूक

By admin | Updated: February 6, 2016 00:03 IST

जोतिबा येथील कामास प्रशासकीय मंजुरी : आराखडा तयार; राज्य सरोवर संवर्धन योजनेतून निधी

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर --पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी (जोतिबा) येथील शिवकालीन कर्पूरेश्वर तलावास पर्यटनाचा ‘लूक’ मिळणार आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेतून या तलावासाठी २ कोटी ३८ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत. कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील यांनी मंत्रालयीन स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या तलावास शासनाकडून निधी मिळाला आहे. अन्य दोन तलावांचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रसिद्ध आराध्य दैवत म्हणून पुराणकाळापासून श्री जोतिबा प्रसिद्ध आहे. डोंगरावरील वाडी रत्नागिरीची लोकसंख्या ४,७०० इतकी आहे. यात्राकाळासह इतर वेळीही जोतिबा डोंगरावर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. ग्रामस्थ व बाहेरून येणारे भाविक यांना पाणी व अन्य मूलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीवर ताण पडतो.सध्या केर्ली (ता. करवीर) येथून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरून कासारी नदीतून पिण्यासाठी डोंगरावर पाणी नेले आहे. ४५० मीटर उंचीवर पाणी जात असल्यामुळे तीन ठिकाणी ते विद्युतपंपाने उपसावे लागते.जोतिबा येथे केवळ पाण्यासाठीच्या वीजबिलापोटी वर्षाला १६ ते १७ लाख रुपये खर्च करावे लागतात. ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे ठोस मार्ग नसल्यामुळे विजेचे बिल भरणे अवघड होत आहे. यामुळे डोंगरावर असलेल्या शिवकालीन तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.डोंगरावर कर्र्पूरेश्वर, गायमुख, चव्हाण, मुरलीधर, यमाई असे तलाव आहेत. अनेक वर्षांपासून या तलावाच्या देखभाल-दुरुस्तीकडे, नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पाणी दूषित झाले आहे. तसेच तलावात जलपर्णी वाढली आहे.दरम्यान, शिवकालीन कर्पूरेश्वर, मुरलीधर, गायमुख तलावातून पिण्यासाठी पाणी वापरणे शक्य आहे. याशिवाय तलावाचे सुशोभीकरण, दुरुस्ती, बगीचा तयार केल्यास पर्यटकही रेंगाळतील. त्यामुळे या तीन तलावांना पर्यटनाचा लूक असणारा एन. एस. इंजिनिअरिंग अ‍ॅँड एन्व्हायर्न्मेंटल सोल्युशन संस्थेने ेआराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. संवर्धन योजनेच्या निकषांनुसार दहा टक्के लोकवर्गणी आणि उर्वरित शासनाचा निधी मिळणार आहे. तलावासाठी निधी देताना जैवविविधता, पर्यावरण अशा अनेक अंगांनी विचार होतो. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. काय कामे होणार? तलावातील गाळ काढणे, परिसराची स्वच्छता करणे, तलावाच्या भिंतीचे बांधकाम करणे, पदपथ तयार करणे, संरक्षक भिंत बांधणे, वृक्षारोपण करणे, सौरऊर्जेद्वारे पाणीवापर सुविधा उपलब्ध करणे, सांडपाणी व्यवस्थापन व बाग तयार करणे, अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.कर्पूरेश्वर तलावासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण करून महिन्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.- जी. डी. काटकर, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा