शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जगात साखरेची कमी; भारताला निर्यातीची हमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 05:35 IST

मागणीपेक्षा उत्पादन कमी होण्याचा अंदाज : साखर उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’

चंद्रकांत कित्तुरेलोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जगात आगामी दोन वर्षे साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा ५० ते ६० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. ही तूट भरून काढण्याची क्षमता भारताकडे असल्यामुळे देशातील साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.

जगात ब्राझील, भारत, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार प्रमुख साखर उत्पादक देश आहेत. थायलंडमध्ये उसाचे उत्पादन घटले आहे. युरोपियन युनियनमध्येही तशीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे ब्राझीलमध्ये यंदा ऊस कमी असल्याने साखर उत्पादन घटणार आहे. याउलट भारतात मात्र अतिरिक्त साखर आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव २७०० रुपये क्विंटलच्या आसपास आहेत. केंद्र सरकारकडून निर्यात अनुदानाची प्रतिटन ६००० रुपये मिळणारी रक्कम विचारात घेता निर्यात साखरेला प्रतिटन सुमारे ३३०० रुपये भाव मिळत आहे. हा भाव वाढता राहण्याची शक्यता लक्षात घेऊनच केंद्राने चालू साखर हंगामासाठी निर्यात अनुदान प्रतिक्वंटल १०४८ वरून ६००० रुपयांवर आणले आहे.

इंडोनेशियाला हवी ३० लाख टन साखरइंडोनेशिया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर आयातदार देश आहे. तेथील साखरेच्या १३ रिफायनरींना कच्ची साखर लागते. या देशाला सध्या तातडीने ३० लाख टन कच्ची साखर हवी आहे. यासाठी त्या देशातील प्रतिनिधी, राष्ट्रीय साखर महासंघ आणि केंद्र सरकारचे अधिकारी यांची मंगळवारी दीड तास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. उच्च दर्जाची गुणवत्ता आणि जवळ असल्याने वाहतूक खर्च कमी यामुळे इंडोनेशिया - भारत यांच्यात लवकरच ३० लाख टन साखर निर्यातीचा करार होण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारात साखरेला चांगला भाव मिळत आहे. कच्च्या साखरेला मागणी जादा असल्याने कारखान्यांनी या साखरेचे उत्पादन वाढविले तर ६० लाख टन निर्यातीचे लक्ष्य गाठता येऊ शकेल.- प्रकाश नाईकनवरे,व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

ब्राझील आणि थायलंड या दोन पारंपारिक नियातदार देशात साखरेचे उत्पादन घटणार आहे उलट भारतात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. ही अतिरिक्त साखर निर्यात करण्याची मोठी संधी महाराष्ट्रासह देशातील कारखानदारांना मिळणार आहे. - विजय औताडे, उद्योगातील तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने